कुवेत येथे आशियाई ४०० मीटर रनिंग स्पर्धेत वर्णे गावची कन्या अनुष्का कुंभार हिला कास्य पदक
प्रकाश शिंदे - Tue 18th Oct 2022 05:05 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा कुवेत येथे आशियाई ४०० मीटर रनिंग स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. या स्पर्धेत वर्णे गावचे माजी सरपंच पै. दत्तात्रय कुंभार यांची कन्या अनुष्का कुंभार हिने कास्य पदकाला गवसणी घातली आहे. तिच्या या यशाने सातारा जिल्ह्याचे नाव अभिमानाने उंचावले असून अनेक खेळाडुंनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर ग्रामस्थांनी वर्णे एक्सप्रेस या नावाने तिच्या पाठीवर कौतुकांची थाप दिली.
अनष्काचे वडील दत्तात्रय कुंभार हे पैलवान आहेत. बिकट परिस्थिती आणि कुटुंबाची जबाबदारीमुळे अनेक स्पर्धेमधून यश मिळवण्याचे त्यांचे स्वप्न अर्धवट राहिले. हे स्वप्न त्यांनी अनुष्काच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यांना तिन्ही मुली आहेत. वडिलांसमवेत अनुष्का मुलींना घडवायचे हे ध्येय त्यांनी डोळे पुढे ठेवले आहे. अनुष्काला लहानपणापासून धावण्याची आवड होती. शालेय स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत तिने यश मिळवले. हे पाहून वडील दत्तात्रय यांनी धावण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वतःच ते तिचे मार्गदर्शक झाले.
वडीलांच्या स्वप्नांना दिले बळ

• वर्णे एक्सप्रेस म्हणत गावकऱ्यांनी केला अनोखा सन्मान
अनुष्काच्या पाठोपाठ तिच्या दोन्ही बहिणींचे ते मार्गदर्शक आहेत. ईश्वरी ही अभ्यासात हुशार आहे तर स्वरा ही ४ वर्षाची असून पैलवान होण्याचे प्रशिक्षण घेत आहे. आई सत्यभामा या गृहिणी असून आपल्या कुटुंबाला त्या खंबीर साथ देत आहेत. अनुष्काने वयाच्या १६ वर्षापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेऊन यश मिळवले आहे. वडील दत्तात्रय यांच्या मार्गदर्शनाला चार चांद लागले
वर्णेच्या अनुष्काची कुवेतमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली
आणखी जोड देण्याचे काम क्रीडा विभागाचे तत्कालीन तालुका विकास अधिकारी बळवंत बाबर यांनी दिले. गेल्या ५ वर्षापासून ते स्वत: अनुष्काला ट्रेनिंग देत आहेत. कोरोना काळात तिची प्रॉक्टीस थांबू नये म्हणून त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. यामुळे कोरोना काळात तिचा सराव सुरूच होता. अनुष्का जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवते. ती न थकता सातत्याने परिश्रम घेते. हे परिश्रम तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा इतिहास उभा करणार असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.अनुष्का हिने वर्णे गावचे नाव उंचावले आहे. याची जाणीव गावातील प्रत्येकाला असून घराघरात तिच्या नावाची चर्चा नेहमी होते. यामुळेच तिने आशियाई स्पर्धेत कास्यपदक मिळले. ही बातमी गावकऱ्यापर्यंत पोहचली. त्यांनी सोशल मीडियावरून तिला शुभेच्छा दिल्या. तसेच व्हॉट्सॲपवर तिच्या फोटोचा डीपी व स्टेट्सही अनेकांनी ठेवला.
भारतातील पहिली स्पर्धेक ठरली असती
ऑलिम्पिक चाचणीमध्ये १६ वयोगटाच्या शेवटच्या दोन अडथळ्याच्या ट्रॅकमध्ये ती अडखळली. साताऱ्यात तिला अडथळ्याच्या शर्यतीचा ट्रॅक नसल्याने ती अडकली. अन्यथा ती १६ वयोगटाच्या आतील भारतातील पहिली स्पर्धेक ठरली असती. यामुळे असा ट्रॅक तयार करण्यात यावेत. ज्यामुळे आणखी अनुष्का घडतील. ऑलम्पिमध्ये जाऊन यश मिळवतील, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 18th Oct 2022 05:05 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Tue 18th Oct 2022 05:05 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 18th Oct 2022 05:05 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Tue 18th Oct 2022 05:05 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 18th Oct 2022 05:05 am
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 18th Oct 2022 05:05 am
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Tue 18th Oct 2022 05:05 am
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Tue 18th Oct 2022 05:05 am
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Tue 18th Oct 2022 05:05 am
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Tue 18th Oct 2022 05:05 am













