शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाहिला आयपीएलचा लाईव्ह सोहळा

सातारा : मुंबई इंडियन्स व लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये झालेल्या आयपीएल सामन्यासाठी सातारमधून शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लावली हजेरी. मुंबई इंडियन्स संघाने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध वानखेडे मैदानावर सामना खेळला. हा सामना पाहण्यासाठी ई.एस. ए. एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल अंतर्गत 19000 मुले स्टेडियम मध्ये उपस्थित होती. यामध्ये आमच्याही शाळेच्या 31 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 




यातून त्यांना स्वतःच्या आदर्श खेळाडूला प्रत्यक्ष खेळताना पाहता आले. तसेच आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देता आले.मुंबई इंडियन संघाकडून ई. एस. ए. दिन उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. वत्सला डुबल मॅडम, संस्थेचे दोन्ही उपाध्यक्ष मा. श्री.जगन्नाथ किर्दत सर व मा. श्री.नंदकुमार जगताप सर , संस्थेचे सचिव मा. श्री. तुषार पाटील सर व स्कूल कमिटी चेअर पर्सन मा. सौ. प्रतिभा चव्हाण मॅडम, माजी अध्यक्ष मा. श्री. प्रतापराव पवार सर ,संचालिका मा. सौ हेमकांची यादव मॅडम तसेच मा. श्री. विनीत पाटील सर व रिलायन्स फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सामना पाहण्याचा व आनंद घेण्याचा अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खरोखरच पाहण्यासारखा होता. सर्व संस्था प्रमुख व पालक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


Default Image Caption


आतापर्यंत जे क्रिकेट टिव्हीच्या माध्यमातूनच पहात होते तो सामना मैदानावर जाऊन लाईव्ह पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणी तोच आनंद आज क्रिकेटचा सामना पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता या उपक्रमाचे कौतुक सर्व विद्यार्थ्यांनी केले असे विविध उपक्रम शाळेने राबवावेत या मुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अनखी भर पडेल असे पालकांकडून बोलले जात होते या उपक्रमाचे स्वागत करत पालकांकडून शाळेचे आभार व्यक्त केले
आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त