न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात

सातारा : शिक्षण प्रसारक संस्थेच्या  न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, करंजे पेठ,सातारा येथे शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना  वाव देण्यासाठी शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.यावेळी बँड पथकाचे उत्तम सादरीकरण करण्यात आले.याप्रसंगी इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचे उत्कृष्ट सादरीकरण केले व इयत्ता तिसरी ते दहावीच्या विदयार्थ्यांचे मार्चिंगही प्रमुख पाहुण्यांसमोर घेण्यात आले. आर्चरी, कराटे, मल्लखांब, कुस्ती,किक बॉक्सिंग व बॉक्सिंग च्या खेळाडूंनी मशाल हाती घेऊन खेळाची ज्योत प्रज्वलित केली. इयत्ता आठवी व नववी विरुद्ध दहावीच्या कबड्डीच्या प्रदर्शनीय सामन्याने विद्यार्थ्यांचा   उत्साह द्विगुणीत झाला .

     क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी  प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय पातळीचे बास्केट बॉल खेळाडू व प्रशिक्षक मा. श्री.नितेश भोसले उपस्थित होते.खेळ व जीवन याची सुयोग्य सांगड कशी घालावी हे त्यांनी विदयार्थ्यांना सांगितले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा.जगन्नाथ किर्दत सर व उपाध्यक्ष  नंदकुमार जगताप सर,संस्थेचे सचिव मा. श्री.तुषार पाटील सर , स्कूल कमिटी चेअर पर्सन मा. सौ. प्रतिभा चव्हाण मॅडम, व संचालिका मा. सौ. हेमकांची यादव मॅडम, संचालक मा. श्री. रविंद्र जाधव सर उपस्थित होते.     

      यावेळी संस्थेच्या स्कूल कमिटी चेअर पर्सन मा. सौ. प्रतिभा चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.संस्थेचे सचिव मा. श्री. तुषार पाटील सर यांनी या वेळी विदयार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच पालक व शिक्षक यांच्याही स्पर्धा आयोजित कराव्यात हे सूचित केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.रसिका निकम  यांनी केले व अतिथी परिचय सौ. तृप्ती शिंदे यांनी करून दिला.क्रिडा दिनासाठी  क्रिडा शिक्षिका सौ. कोमल घाडगे यांनी संपूर्ण नियोजन व अंमलबजावणी केली. शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. निलम शिंदे यांनी आभार व्यक्त केले.शाळेच्या पर्यवेक्षिका कु. दिपाली कदम,पी. आर. ओ. सौ. मंजुषा किरकिरे व सर्व सहाय्यक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य, तसेच सर्व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.  पुढील दोन दिवस इयत्ता नर्सरी ते दहावीच्या वर्गांच्या विविध क्रिडा प्रकारांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला