क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर

सातारा :  क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात महाराष्ट्र राज्यामध्ये क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार करणे, नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहचविने, युवक-युवतींमध्ये क्रीडा विषयक जाणीव व वातावरण निर्माण करणे हे ख-या अर्थाने क्रीडा व खेळांची प्रगती साध्य केल्या शिवाय शक्य होणार नाही. महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्हयात दरवर्षी दि. १२ ते १८ डिसेंबर हा सप्ताह, क्रीडा सप्ताहा म्हणून साजरा केला जातो. दिनांक १२/१२/२०२४ रोजी क्रीडा सप्ताहची सुरवात श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे जल्लोषात करण्यात आली. या सप्ताहाची सुरवात रस्सीखेच या स्पर्धेने झाली.

 या स्पर्धेमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथील माणदेशी स्पोर्ट्स क्लबच्या मुली यांचा संघ विजय झाला. या संघाचे नेतृत्व सिद्धी नरुळे यांनी केले, या संघातील प्रियांका शिरोळे, जान्हवी चव्हाण, सानिका नरुळे, समीक्षा नरुळे, स्वप्नाली वालेकर, मृणाली साबळे, साक्षी जाधव, ऋतुजा महाडीक, मनोरमा खरात, अनाम फारस, श्वेता म्हेत्रे, कामिनी वाघमळे, सोनाली पवार व आकांक्षा पवार यांचा दमदार प्रयत्नांनी संघ विजयी झाला. 

या वेळी विविध गटातील लहान मुलांच्या स्पर्धा देखील संपन्न झाल्या. क्रीडा सप्ताह उद्घाटन प्रसंगी सातारा जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर व सुधा साबळे या देखील उपस्थित होत्या, शिक्षण व क्रीडा कार्यालायचे क्रीडाअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विजेत्या संघांचे सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या हस्ते झाला.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

आंधळीत उद्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वर्धापन दिनाचे आयोजन

आंधळीत उद्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वर्धापन दिनाचे आयोजन

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त