नायगाव ते वाई क्रांतिज्योत आणून स्वयंसेवकांचे सावित्रीबाईंना अभिवादन
किसन वीर मधील एन.एस. एसचा उपक्रम
बापू वाघ- Wed 4th Jan 2023 03:45 pm
- बातमी शेयर करा
वाई :जानेवारी हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा जयंतीसोहळा प्रत्येकजण वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करीत असतो. किसन वीर च्या एन.एस.एस. विभागाने १९२ वा जयंती सोहळा साजरा करताना महाविद्यालयाची परंपरा अबाधित ठेवून नायगाव या सावित्रीबाईंच्या जन्मगावातून वाईपर्यंत क्रांतिज्योत आणण्याचे ठरविले. त्यासाठी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांचे खंबीर पाठबळ मिळाले. प्रकल्प अधिकारी डॉ. अंबादास सकट व डॉ. संग्राम थोरात यांनी त्याचे नेटके नियोजन केले.
समाजसुधारणेच्या कार्यात संपूर्ण आयुष्य समर्पण करणा-या सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण देण्यासाठी अंगावर दगड-गोटे झेलले याची जाणीव आजच्या एन.एस.एस. स्वयंसेवकांनाही असल्याने क्रांतिज्योत धावत आणण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांचे शोषण, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष त्यांच्यासाठी प्रेरणादायी असल्याचा मानस सर्व सहभागी स्वयंसेवकांनी बोलून दाखविला व नायगाव ते वाई क्रांतिज्योत आणताना मुलांच्या बरोबरीने मुलींनीही ज्योत घेऊन आपण सावित्रीच्या लेकी कुठेही कमी नसल्याचे सिद्ध केले.
क्रांतिज्योत महाविद्यालयात येताच प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, डॉ. भानुदास आगेडकर, डॉ. शिवाजी कांबळे यांनी जोरदार स्वागत केले. डॉ. मंजूषा इंगवले व सर्व महिला प्राध्यापकांनी क्रांतिज्योत महाविद्यालय परिसरात फिरवली व सुशोभित रांगोळी काढून महाविद्यालयाच्या दर्शनी भागात ज्योत ठेवली.
याप्रसंगी एन.एस.एसच्या स्वयंसेवकांनी सावित्रीबाईंच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगांवर व त्यांच्या व्यक्तिमत्वावरील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी भीत्तीपत्रके तयार केली होती. त्याचे अनावरण प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. क्रांतिज्योत आणण्यासाठी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुनील सावंत, जयवंत खोत, डॉ. अरुण सोनकांबळे, स्वयंसेवक ऋृचा देशमुख, रसिका व्याहळीकर, सानिका सणस, प्रतिक्षा पार्टे, अक्षता वाडकर, प्राची काळे, ऋृचिता सोंडकर, ऐश्वर्या साळुंखे, संकेत दळवी, संतोष राजपुरे व सुयश पार्टे यांचे सहकार्य लाभले.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 4th Jan 2023 03:45 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 4th Jan 2023 03:45 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 4th Jan 2023 03:45 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 4th Jan 2023 03:45 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 4th Jan 2023 03:45 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 4th Jan 2023 03:45 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 4th Jan 2023 03:45 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 4th Jan 2023 03:45 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 4th Jan 2023 03:45 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 4th Jan 2023 03:45 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 4th Jan 2023 03:45 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 4th Jan 2023 03:45 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 4th Jan 2023 03:45 pm













