साताऱ्यात आणखी एका कॅफे मालक सह आरोपी.आणखीन एक पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल
Satara News Team
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती केल्याप्रकरणी युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असतानाच शहर पोलिसांनी कॅफे चालक व त्यावरील कर्मचाऱ्यालाही सहआरोपी केले आहे. स्वीट कपल असे कॅफेचे नाव असून तो सेव्हन स्टार बिल्डींगमध्ये आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईने कॅफे चालकांचे धाबे दणाणले आहेत.ओंकार बाळासो साळुंखे (वय १९, रा. देगाव ता.सातारा) असे अत्याचार केलेल्या युवकाचे नाव असून त्याला याअगोदर अटक झालेली आहे. प्रतीक राजेंद्र कांबळे (वय २५) व पुष्कर सुधीर साबळे (दोघे रा. शिवथर ता. सातारा) असे कॅफे मालक व कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन ओंकार साळुंखे याने मुलीवर अत्याचार केले. या घटनेत मुलगी गर्भवती राहिल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात ओंकार विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिसांचा तपास सुरु असताना सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात असलेल्या सेव्हन स्टार बिल्डींगमधील स्वीट कपल कॅफेमध्ये पिडीत मुलीवर अत्याचार झाल्याचे तपासात समोर आले. यामुळे तपासी अधिकारी यांनी कॅफे मालक व त्यावरील चालकालाही सहआरोपी केले. कॅफे मालक प्रतीक कांबळे याला पोलिसांनी अटक केली तर त्यावरील कर्मचारी पुष्कर साबळे हा पसार झाला आहे. कॅफे मालक व चालकाने कॅफेमधील संशयिताला गैरकृत्य वरील मजल्यावर करण्यास अपप्रेरणा दिल्याचे पोलिस तपासात समोर आल्याने पोलिसांनी त्यानुसार कारवाई केली. दरम्यान, गेल्या दीड महिन्यांपूर्वी देगाव फाट्यावरील कॅफे मालका विरुध्दही पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कॅफे चालकांना रडारवर घेवून कॅफे कसे असावेत? याबाबतची सूचना करण्यात आली. असे असतानाच आणखी एका कॅफे मालकालाही पोक्सोच्या गुन्ह्यात सहआरोपी केल्याने व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
स्थानिक बातम्या
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
संबंधित बातम्या
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sat 3rd Jun 2023 10:43 am
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sat 3rd Jun 2023 10:43 am










