मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
Satara News Team
- Wed 12th Aug 2026 11:11 am
- बातमी शेयर करा
मेढा : मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात अत्याचार व लैंगिक छळाचा गंभीर गुन्हा दाखल असलेला बॉलिवूड दिग्दर्शक व निर्माता शकील नुरानी याचा जावळीच्या रेंगडीतील फार्महाऊसमध्ये लपून बसण्याचा डाव अखेर मेढा पोलिसांनी उधळून लावला. मुंबई पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील रेंगडी येथील फार्महाऊसचा आसरा घेतलेल्या नुरानीला मेढा पोलिसांनी धडक कारवाई करत ताब्यात घेतले आणि मुंबई पोलिसांच्या पथकाकडे सुपूर्द केले. त्यामुळे मुंबईतील गुन्ह्यानंतर जावळीच्या आडोशाला दडण्याचा प्रयत्न अखेर फोल ठरला.
एका ३३ वर्षीय अभिनेत्रीने नुरानीविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आगामी चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने अभिनेत्रीला घरी बोलावून नशेचे पदार्थ देण्यात आले आणि चित्रिकरणाच्या माध्यमातून धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गंभीर आरोपांनंतर मुंबई पोलिसांकडून नुरानीचा शोध सुरू होता. मात्र तो पोलिसांना सापडत नसल्याने तपास यंत्रणांसमोर त्याला शोधण्याचे आव्हान निर्माण झाले होते.
दरम्यान, नुरानी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील रेंगडी येथील फार्महाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. मालवणी पोलिसांनी तातडीने मेढा पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस धीरजकुमार बेचके आणि शिवाजी डफळे यांनी शोधमोहीम सुरू केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेंगडी येथील नुरानीच्या शेतघरावर सायंकाळी अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत नुरानीला ताब्यात घेण्यात मेढा पोलिसांना यश आले.
मुंबईत गुन्हा दाखल झाल्यानंतर जावळीच्या ग्रामीण भागात फार्महाऊसचा आसरा घेतल्याने पोलिसांच्या नजरेतून सुटका होईल, असा नुरानीचा अंदाज असावा; मात्र मेढा पोलिसांच्या तपासाची दिशा आणि तत्पर कारवाईमुळे त्याचा हा डाव उधळला गेला. ताब्यात घेतल्यानंतर मेढा पोलिसांनी नुरानीला मुंबई पोलिसांच्या पथकाकडे सुपूर्द केले असून, आता त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई मुंबईत केली जाणार आहे.
स्थानिक बातम्या
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Wed 12th Aug 2026 11:11 am
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Wed 12th Aug 2026 11:11 am
शिंदे साहेब, जावळी-महाबळेश्वरची हाक ऐका!
- Wed 12th Aug 2026 11:11 am
“सात संचालक ‘ताब्यात’… तरी ठराव धुळीस! हुमगावात मानकुमरेंचा हल्लाबोल
- Wed 12th Aug 2026 11:11 am
संबंधित बातम्या
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Wed 12th Aug 2026 11:11 am
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Wed 12th Aug 2026 11:11 am
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Wed 12th Aug 2026 11:11 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Wed 12th Aug 2026 11:11 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Wed 12th Aug 2026 11:11 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Wed 12th Aug 2026 11:11 am
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Wed 12th Aug 2026 11:11 am
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Wed 12th Aug 2026 11:11 am













