एसटीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
Satara News Team
- Wed 15th May 2024 03:02 pm
- बातमी शेयर करा
कराड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत दुभाजकाच्या झाडीतून घाईगडबडीत महामार्ग ओलांडताना भरधाव एसटीची धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. सोमवारी दुपारी पावनेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. बंटीराज बल्लाळ (रा. तांबवे, ता. वाळवा) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
अपघातस्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंटीराज बल्लाळ हा काही कामानिमित्त गोटे गावच्या हद्दीत आला होता. सोमवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत हॉटेल सेफ्रोन समोर तो कोल्हापूर-पुणे लेनवरून महामार्ग ओलांडत पूर्वेकडे जात होता. गडबडीत दुभाजकातील झाडीमधून तो पुणे-कोल्हापूर लेनवर गेला असता परेल ते कवठेमहांकाळ एसटी (एमएच डीटी ३९५७) ची बल्लाळ याला धडक बसली.
या धडकेत बल्लाळ हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच जवळच वास्तव्यास असलेले डीपी जैनचे कर्मचारी दस्तगीर आगा घाटनास्थळी धावले. त्यांनी एसटी महामंडळ व महामार्ग देखभाल विभागासह पोलिसांना माहिती दिली. कहऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदाळे यांच्यासह हवालदार हेमंत महाले तत्काळ अपघास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने जखमीला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तो मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Wed 15th May 2024 03:02 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Wed 15th May 2024 03:02 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Wed 15th May 2024 03:02 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Wed 15th May 2024 03:02 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Wed 15th May 2024 03:02 pm
संबंधित बातम्या
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Wed 15th May 2024 03:02 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Wed 15th May 2024 03:02 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Wed 15th May 2024 03:02 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Wed 15th May 2024 03:02 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Wed 15th May 2024 03:02 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Wed 15th May 2024 03:02 pm
-
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Wed 15th May 2024 03:02 pm
-
पुसेसावळी येथे झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
- Wed 15th May 2024 03:02 pm













