लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाची खेळाडू आदिती स्वामीची आर्चरी वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये विश्वविक्रमी कामगिरी

सातारा: कोलंबीया येथे  सुरू असलेल्या वर्ल्ड कप आर्चरी स्पर्धा 2023 स्पर्धेमध्ये लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या आदिती स्वामींनी आर्चरी मधील कंपाउंड खेळ प्रकारात ७२० पैकी 711 गुण प्राप्त करून एक नवीन विश्वविक्रम केला. तर संगीत राऊंडमध्ये ब्रांझ मेडल मिळवले.
अवघ्या सोळा वर्षाच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या  आदिती ने  केलेल्या या विश्वविक्रमामुळे सातारा जिल्हा तसेच देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या या खेळाडूच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांनीही तिचे कौतुक केले संस्थेच्या सचिवा शुभांगी गावडे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी खेळाडूचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेजवळ आर्वी यांनी महाविद्यालय व देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी आदितीने केल्याची भावना व्यक्त केली. आदितीचे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांनी खेळाडूच्या कामगिरी बाबत समाधान व्यक्त केले आदितीच्या या अबूतपूर्व यशासाठी मार्गदर्शन लाभले ते जूनियर जिमखाना प्रमुख प्राध्यापक भोई विनायक सर यांचे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा आदितीने रोला यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक स्टाफ प्रशासकीय स्टाफ यांनी देखील शब्दसुमनाद्वारे आधी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त