आनेवाडीनजीक भरधाव टँकरने 3 महिलांना उडवले; दोघींचा मृत्यू तर ९ वर्षांची मुलगी गंभीर जखमी

सातारा : आनेवाडी टोलनाक्यावरून बेळगावकडे निघालेल्या टँकरच्या चालकाचा टँकर वरील ताबा सुटल्याने महामार्गालगत वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन महिलांसह मुलीला या टँकरने उडविल्याने या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.
याबाबत अपघात स्थळावरून घेतलेली माहिती अशी पुणे बंगलोर महामार्गावतील आनेवाडी टोलनाक्याजवळ टँकर ( GJ 20 - V - 7473 ) हा सातारा बाजूकडे निघाला असताना टॅंकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गालगत उभ्या  असलेल्या दोन महिला व एका मुलीला या टँकरने उडविल्याने या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली यांची नावे समजू शकली नाहीत तर सायली दिलीप कांबळे हि मुलगी जखमी झाली आहे. त्यांना अधिक उपचासाठी सातारा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर महामार्गाचे पोलीस उप निरीक्षक घनवट व इतर महामार्ग पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जखमींना सातारा येथे उपचारासाठी पाठवून दिले.
या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपस पोलीस हवालदार अवघडे, पो. ह. जाधव व पो. नाईक धुमाळ करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला