रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला
Satara News Team
- Sat 11th May 2024 11:11 am
- बातमी शेयर करा
पाटण : रक्षा विसर्जन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवल्याची घटना पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातील मराठवाडी येथे गुरुवारी घडली. या हल्ल्यामध्ये तब्बल ७० जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर सध्या कराडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ढेबेवाडी भागातील मराठवाडी गावात नदीकाठी असलेल्या स्मशानभूमी जवळ काही नागरिक गुरूवारी रक्षा विसर्जन करण्यासाठी गेले होते. याचवेळी जवळच असलेल्या मधमाश्यांनी या सर्वांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने सर्वजण घाबरुन गेले.
या हल्ल्यामध्ये ७० नागरिक जखमी झाले. त्यांना काही खासगी वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे ढेबेवाडी विभागात एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 11th May 2024 11:11 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 11th May 2024 11:11 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 11th May 2024 11:11 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 11th May 2024 11:11 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 11th May 2024 11:11 am
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sat 11th May 2024 11:11 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 11th May 2024 11:11 am
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Sat 11th May 2024 11:11 am
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 11th May 2024 11:11 am
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Sat 11th May 2024 11:11 am
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Sat 11th May 2024 11:11 am
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Sat 11th May 2024 11:11 am










