सर्वोदय सेवा ट्रस्टचा शैक्षणिक उपक्रम यशस्वी
विद्यार्थी, युवांना करिअर मार्गदर्शनातुन दिला यशाचा मुलमंत्र - आयपीएस श्री. वैभव निंबाळकर
बापू वाघ- Wed 7th Dec 2022 10:53 am
- बातमी शेयर करा
वाई: वाई विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत असतानाच मोठी स्वप्ने उराशी बाळगत ती साकारण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांनी केले. न्यु चित्रा टाॅकिज वाई येथे सर्वोदय सेवा ट्रस्ट वाई व जीवन विद्या मिशन वाई यांच्या संयुक्त विद्यमाने "यशस्वी मी होणारच" या विषयावरील करिअर मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांनी सद्गुरु वामनराव पै. यांच्या विश्व प्रार्थनेने सुरुवात करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रार्थना आपल्याला जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जाते. याची जाणीवही त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली
तसेच देशसेवा करत असताना स्वतःवर झालेल्या गोळीबाराची माहिती देऊन देशभक्तीचा आदर्शही विद्यार्थ्यांसमोर ठेवला.
आजच्या विद्यार्थ्यांनी मानसिकता योग्य वळणावर ठेवून यश कसे गाठावे, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. "जीवनाच्या वाटेवर शिखर आहे यशाचे , किती ही उंच असले तरी प्रयत्नांनी गाठायचे. "हा कानमंत्र वैभव निंबाळकर यांनी युवा युवती व उपस्थितांना दिला.
सर्वोदय सेवा ट्रस्ट वाई यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. निंबाळकर यांच्या समवेत त्यांचे वडील चंद्रकांत निंबाळकर व आई ही आवर्जून उपस्थित होत्या.
आम्ही प्रकाश बीजे रूजवीत चाललो,वाटा नव्या युगाच्या रूळवीत चाललो.
नव्या पिढीला यशाच्या नव्या वाटा दाखविण्यासाठी आजचे कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सर्वोदयचे ट्रस्टचे अध्यक्ष संजय जेधे(देशमुख) यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी तालुकास्तर कबड्डी प्रथम विजेता न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव 17 वर्षे वयोगट, कन्याशाळा जुनिअर कॉलेज वाई 19 वर्षे वयोगट, अनिशा देवराम घाडगे एनसीसी बेस्ट कॅडेट, यांना पारितोषिक व राज मांढरे यांना शौर्यपदक वैभव निंबाळकर यांच्या हस्ते देऊन गाैरवीण्यात आले.
वाईच्या नायब तहसिलदार वैशाली घोरपडे,मा.जि.प.अध्यक्षा साै.अरुणादेवी पिसाळ,पं.स.सदस्या सुनिता कांबळे, सर्वोदय सेवा ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री.प्रकाश वाडकर सर,सचिव श्री.संतोष वाडकर सर,खजिनदार श्री.ज्ञानदेव वाशिवले सर, सदस्य माणिक बनसोडे,किशोर महांगडे,नंदकिशोर गायकवाड,बापु फणसे,विजय येवले, नविन कांबळे,संतोष शिंदे,शिवाजी धनावडे,बाळकृष्ण तरडे ,सहदेव फणसे ,सुनिल गोळे, पत्रकार पांडुरंग भिलारे,अजित वाडकर,नितिन शिंदे,कलासागर अॅकॅडमीचे लहुराज पांढरे ,हेमंत काळोखे ,वामनराव पै. यांचे सत् शिष्य सतिश जेधे(देशमुख),किसनवीर महाविद्यालयाचे समीर पवार,तसेच शाळा,महाविद्यालय,अॅकॅडमीचे विद्यार्थी,शिक्षक,पालक ,युवा- युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सर्वोदय सेवा ट्रस्टींनी मोलाचे सहकार्य केले.श्री.बाळासाहेब चिरगुटे,प्रदिपदादा चोरगे,विजय ढेकाणे,यांचे विशेष सहकार्य मिळाले. प्रमुख पाहुणे यांचे स्वागत मुख्यप्रवेश द्वाराजवळ बोरगाव हायस्कुलच्या आर.एस.पी. विद्यार्थीनींनी सलामी देऊन केले. कार्यक्रमाचे पाहुने यांचा परिचय कु. कांचन जेधे हिने केला तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन संतोष वाडकर सर यांनी केले.


स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 7th Dec 2022 10:53 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 7th Dec 2022 10:53 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 7th Dec 2022 10:53 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 7th Dec 2022 10:53 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 7th Dec 2022 10:53 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 7th Dec 2022 10:53 am
संबंधित बातम्या
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 7th Dec 2022 10:53 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 7th Dec 2022 10:53 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 7th Dec 2022 10:53 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 7th Dec 2022 10:53 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 7th Dec 2022 10:53 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 7th Dec 2022 10:53 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 7th Dec 2022 10:53 am










