श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले(मॉं साहेब)यांच्या हस्ते होणार शिवतीर्थावर महाशिवआरती

हजारो महिलांच्या उपस्थितीत होणार छत्रपती शिवाजी महाराज यांची महाशिवआरती

सातारा: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या393 व्या जयंतीनिमित्त देशभरात शासकीय व अशासकीय स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात गेल्या वर्षीपासून छत्रपती घराण्याचे  थेट तेरावे वंशज असणारे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामार्फत सातारा शहरातील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाशिवआरती चे आयोजन केले जाते.यंदाचे या कार्यक्रमाचे दुसरे वर्ष आहे. दिनांक 19 /2/2023 रोजी राजवाडा गांधी मैदान सातारा येथून व फुटका तलाव सातारा येथून महिलांची बाईक रॅली होणार आहे आणि दोन्ही बाईक रॅली शिवतीर्थावर पोहचल्यानंतर  सायंकाळी सात वाजता  शिवतीर्थावर होणारी महाशिवआरती  श्रीमंत छत्रपती राजमाता  कल्पनाराजे भोसले(मॉं साहेब)यांच्या शुभहस्ते व महिला रणरागिनी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान आरती पूर्वी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर तथा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात सौभाग्यवती विनिता जोशी यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे छत्रपतींच्या राजमाता आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात दोन्ही वंदनीय महापुरुषांशी संलग्न असणाऱ्या व त्यांच्या रक्त संबंधातील व्यक्तींसोबत कार्यक्रमात सहभागी होण्याचा  सातारकरांसाठी एक दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे की काय? अशी परिस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची  महाशिवआरती श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले (मॉं साहेब)यांच्या शुभ हस्ते आणि सौभाग्यवती वनिता जोशी महिला शाहीर यांचा पोवाडा होणार असल्याने या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील माता-भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह यांच्या वतीने करण्यात आले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला