धर्मवीरांचे विचार समाजापुढे पोहोचवा ... डॉ. अरुणाताई बर्गे : चित्रपट मोफत शो ला प्रचंड गर्दी
Satara News Team
- Sun 29th Sep 2024 07:50 pm
- बातमी शेयर करा
सातारा : धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार प्रेरणादायी होते. जेवढे जीवन जगले ते हिंदुत्व आणि शिवसेना पक्ष वाढवण्यासाठीच घालवले धर्मवीरांचे विचार समाजापुढे येणे गरजेचे असून ते समाजापुढे पोहोचवावेत असे प्रतिपादन डॉ. अरुणाताई बर्गे यांनी केले. दरम्यान निलेश मोरे यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे धर्मवीर २ शो सातारकरांसाठी मोफत ठेवला होता त्याच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. बर्गे बोलत होत्या. यावेळी संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य मीनाक्षीताई मोरे, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद सदस्य प्रवीण पाटील, शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे हे उपस्थित होते.
प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा 'धर्मवीर २' चित्रपट प्रदर्शित झाला असून सातारा शहरातील चित्रपट रसिकांसाठी सातारा शिवसेना शहरच्यावतीने चित्रपट रसिकांना मोफत उपलब्ध करून दिला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती. शोचे उद्घाटन फटाक्याची आतशबाजी व ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटोस दुग्धाभिषेक घातला. रविवारी दिवसभरातील सेव्हन स्टारचे सात शो हाउसफुल्ल झाले असून महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी अनेकांनी निलेश मोरे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजकारण करत आहेत त्याच प्रकारे निलेश मोरे हे सातारा शहर व परिसरात समाजकारण व गरजूंच्या मदतीला धावून जात असल्याचे प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.
यावेळी शिवसेनेचे अमोल इंगोले, विक्रम यादव, निलेश आपटे, किरण कांबळे, शुभम भिसे, माधुरी धनवडे ,सुषमा जाधव, मेघा चोरगे सारिका पवार,सोनाली सकपाळ,मनोज भोसले,अजिंक्य राजपूत,अमोल खुडे ,प्रथमेश बाबर,यश खत्री ,ओंकार गायकवाड, धीरज संकपाळ, मनोज देवळे, अनिकेत भिसे, शांताराम साठे यांच्यासह सातारा शहरातील सर्व बचत गट महिला मंडळ, तमाम शिवसैनिक व पदाधिकारी आणि इतर नागरिक उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 29th Sep 2024 07:50 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sun 29th Sep 2024 07:50 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sun 29th Sep 2024 07:50 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sun 29th Sep 2024 07:50 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sun 29th Sep 2024 07:50 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sun 29th Sep 2024 07:50 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 29th Sep 2024 07:50 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Sun 29th Sep 2024 07:50 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sun 29th Sep 2024 07:50 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Sun 29th Sep 2024 07:50 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Sun 29th Sep 2024 07:50 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Sun 29th Sep 2024 07:50 pm










