शिवथर मध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे आगमन

वन विभागाकडून झाला पंचनामा पण पुढे काय

शिवथर.:  शिवथर तालुका सातारा परिसरामध्ये कित्येक दिवस बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होत आहे शेतामध्ये सुगीचे दिवस चालू असून सुद्धा मोल मजूर शेतामध्ये कामासाठी येत नाही बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

शिवथर या ठिकाणी दिवसा ढवळ्या गावामध्ये येऊन बिबट्याने बकऱ्यावर हल्ला करून ठार केले आहे. सदरची माहिती वन विभागाला दिल्यानंतर तातडीने वनविभागाचे अधिकारी येऊन त्यांनी पंचनामा केला परंतु पंचनामा झाला खरा पण पुढे काय असाही सवाल शेतकरी तसेच ग्रामस्थांमधून केला जात आहे दोन ते तीन बिबटे संपूर्ण परिसरामध्ये फिरत आहेत याचा कायमस्वरूपी बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. वारंवार तोंडी वन विभागाला कळवून सुद्धा कार्यवाही होत नसल्याने थोडी नाराजी व्यक्त केली जात आहे

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला