शिवाजी विद्यापीठ आर्चरी संघात लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे खेळाडू
- कोमल वाघ-पवार
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
- बातमी शेयर करा
सातारा : गुरु काशी युनिव्हर्सिटी भटिंडा (पंजाब)येथे दिनांक 23 ते 28 डिसेंबर 2022 रोजी संपन्न होत असलेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी आर्चरी मुले/मुली स्पर्धेसाठी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील ४ मुली खेळाडू व २ मुलांची निवड शिवाजी विद्यापीठाच्या आर्चरी संघामध्ये करण्यात आलेली आहे.या स्पर्धेमध्ये इंडियन राउंड,कंपाउंड राउंड, रिकव्हर राउंड या तिन्ही क्रीडा प्रकारात महाविद्यालयाचे हे सर्व खेळाडू सहभागी होणार आहेत.शिवाजी विद्यापीठाने घेण्यात आलेल्या इंटर झोनल आर्चरी स्पर्धेमध्ये लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाने उपविजेतेपद प्राप्त केले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडू ची निवड शिवाजी संघात करण्यात आली यामध्ये लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयांमध्ये १)तेजस्विनी बरकडे (M.A.1) २)लीना सावंत, (B. A.1) ३) धनश्री जाधव (B.A.1) ४) स्नेहा सावंत (B.A.1) ५)प्रतीक थोरवे (M.A.2) ६)अमित फाळके (B.A.2) या खेळाडूंची निवड करण्यात आली होती शिवाजी विद्यापीठाचे इंटर झोनल स्पर्धा चे आयोजन लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाने केले केले होते या सर्व विजयी खेळाडूंना लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ उपप्राचार्य डॉक्टर अशोक तवर, डॉ. सी.पी. माने, जिमखाना विभागातील सर्व सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी आणि विशेष करून सर्व विद्यार्थी वर्गांनी अभिनंदन व विशेष कौतुक केलेले आहे. जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव,प्रा. शिरीष ननावरे, श्री प्रकाश महाडिक आणि प्रविण सावंत (भारतीय आर्चरी संघाचे प्रशिक्षक) यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे.
स्थानिक बातम्या
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्यवरांची उपस्थिती
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 28th Dec 2022 04:34 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 28th Dec 2022 04:34 pm