साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

बोटावर मोजण्याइतक्या मंडळांनी पारंपरिक वाद्यांची परंपरा जपली

सातारा : सातारा शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग करून बीम लाईट लावल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत बोटावर मोजण्याइतक्या मंडळांनी पारंपरिक वाद्यांची परंपरा जपली. तर बहुतांश मंडळांनी सर्व नियम डावलून डीजेच्या दणक्यात विसर्जन मिरवणुका काढल्या. लेझर लाईटला बंदी असतानाही मिरवणुकांमध्ये लेझरचा झगमगाट पाहायला मिळाला. काही मंडळांमध्ये तर आवाज वाढविण्याची स्पर्धादेखील दिसून आली. डीजेवरील रिमिक्स गाण्यावर तरुणाई बेभान होऊन थिरकताना दिसून आली. पोलिसांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे रात्री १२ वाजता हा दणदणाट शांत झाला

पोलिसांच्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास शहरातील नगरपालिका चाैकातून गणेश मंडळाची मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग करून बीम लाईट लावण्यात आले. यामुळे पोलिसांनी महादेव आनंदा खापणे (रा. कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला. 

तसेच रात्री नऊच्या सुमारास गोडोली येथील तलाठीनगर येथेही मिरवणुकीत बीम लाईट लावण्यात आले होती. याप्रकरणी पोलिसांनी ब्रदर लाईट सिस्टीमच्या मालकाच्या विरोधात (पूर्ण नाव माहिती नाही) गुन्हा नोंद केला आहे. हे दोन्हीही गुन्हे सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाले आहेत. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त