महात्मा गांधीतील ‘सीसीटीव्ही’ कॅमेराच्या माना झुकल्या!

दहिवडी : आशिया खंडातील नावारूपाला आलेली रयत शिक्षण संस्था.ही संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अथक प्रयत्नातून उभी राहिली.सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत.याच भावनेतून स्व.कर्मवीर आण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.गोरगरिबांची मुले शिकवली.'कमवा आणि शिका' ही संकल्पनाही अण्णांनी सुरू केली.

 

परंतु ही रयत शिक्षण संस्था रयतेची राहिली नसल्याची चर्चा सुरू आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रंथपाल रवींद्र जंगम यांनी सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यास अमानुष केलेली मारहाण.त्यानंतर पालकांनी त्या ग्रंथपाला विरोधात पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार.दुसऱ्या दिवशी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर शेकडो पालकांनी केलेले ठिय्या आंदोलन.ग्रंथपाल जंगम,प्राचार्य बबन खाडे,उपशिक्षक ज्ञानेश काळे यांच्याविरोधात केलेली कारवाईची मागणी.मागणीची दखल घेऊन संस्थेच्या सहसचिवांनी ग्रंथपाल जंगम यांच्यावर केलेली सक्तीच्या रजेची कारवाई. त्यानंतर स्थगित केलेले ठिय्या आंदोलन. हा सर्व घटनाक्रम पाहता रयत मध्ये चाललय तरी नक्की काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी बदलापूर मध्ये चिमुकलीवर झालेला अत्याचाराचा प्रकार ताजा असतानाच दहिवडीतील महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्येही विद्यार्थिनी आहेत.परंतु त्यांची सुरक्षितता प्राचार्यांना किती महत्त्वाची वाटते.अशी चर्चा पालकांमध्ये सुरू आहे.या ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी,बारावीच्या शेकडो विद्यार्थिनी तालुक्यातून शिक्षण घेण्यासाठी येत असतात.वारंवार परिसरात छेडछाडीचे प्रकार घडत असतात.अल्पवयीन मुलींवर छेडछाड,विनयभंग,बलात्कारांसह हृदय पिळवटून टाकणारे प्रकारही माण तालुक्यातील मुलींबद्दल घडत आहेत. परंतु प्राचार्य बबन खाडे यांच्यासह शिक्षकांचेही प्रवेशदारासमोर असणाऱ्या सीसीटीव्हीकडे जाणून-बुजून दुर्लक्ष होत आहे.यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्हीच्या माना ताठ कधी होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त