मेढा नियोजित घनकचरा प्रकल्पास सोनगाव ग्रामस्थांचा विरोध

जावली  : जावली तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा नगरपंचायतीने सोनगाव येथील जागेत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नियोजित केलेला आहे. हा घनकचरा प्रकल्प होवू नये. यासाठी सोनगाव ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. तशा आशयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे. त्याच निवेदनाला ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मेढा नगरपंचायतीला दिलेल्या सुचनांचे पत्र सादर केलेले आहे.

आज मंगळवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई  यांची भेट घेऊन सोनगाव ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी सोनगाव ग्रामस्थ जयदीप शिंदे, जगन्नाथ पिसाळ, मधूकर शिंदे, जितेंद्र शिंदे, लक्ष्मण चिकणे, जितेंद्र चिकणे, विश्वनाथ शिंदे, अविनाश तिवाटणे, युवराज शिंदे, नारायण शिंदे, संपत चिकणे, नथूराम चिकणे, सत्यवान शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयदीप शिंदे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी चार महिन्यापूर्वी सोनगाव ग्रामस्थाबाबत बाबत एक अन्यायकारक आदेश काढला आहे. मेढा नगरपंचायतीचा कचरा सोनगावच्या गायरान क्षेत्रात टाकण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाचा तीव्र निषेध करत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी २०२१ साली सुद्धा ग्रामसभेचा ठराव पुर्णपणे विरोधी असून सुद्धा गायरान या क्षेत्रात पुर्वी वीज वितरण कंपनीला जागा दिलेली आहे त्यातली अर्धी जागा शिल्लक असताना ती जागा आमच्या गावातील पाळीव जनावरांना गवत चरण्यासाठी होती. २००आंब्याची झाडे आहेत. त्याचा विचार न करता मेढा नगरपंचायतीचा नियोजित घनकचरा प्रकल्प सोनगावच्या गायरान जमिनीत करण्यात येणार आहे. तो आदेश रद्द करावा. त्याऐवजी मेढा नगरपंचायतीच्या हद्दीत शासकीय जागा उपलब्ध आहेत. मेढयापासून सोनगाव हे तेरा किलोमीटरवर आहे. त्याचा कचरा येथे आणायचा आणि विल्हेवाट लावायची ही योग्य बाब नाही.

प्रतापगड कारखाना कामगार वसाहत आहे. कारखान्याचे ऑफिस, शाळा, वाढीव गाव आहे. लोकवस्तीत हा कचरा प्रकल्पाचा घाट कशासाठी? हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सदर निवेदनाची तपासणी करून योग्य ते निर्णय घेतला जाईल असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत  बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त