शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

शिवथर. :  शिवथर तालुका सातारा येथील शेलवट या परिसरामध्ये व आरफळ येथील रेल्वे गेट या ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत बऱ्याच शेतकऱ्यांनी वनविभाग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे 


        शिवथर-आरफळ परिसरामध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर होत असल्याने शेतकरी शेतात जाण्याला भीत आहेत तसेच मेंढपाळ हे शेळ्या चारण्यासाठी रानामध्ये घेऊन जात नाहीत त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे शेतकरी वर्ग देखील जनावरांना चारा आणण्यासाठी जात नसल्याने तसेच त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असल्याने त्यांचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्याने तातडीने लक्ष घालून या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त केला जावा अशी ही विनंती शेतकऱ्यांमधून केली जात आहे.


सध्या सुगीचे दिवस असल्याने शेतातील कामे राहिलेली आहेत परंतु आमच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याने शेतात शेतमजूर येत नाही त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून या बिबट्याचा बंदोबस्त करावा. 
     सचिन साबळे-शेतकरी शिवथर

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त