पी.एन.जी.महाकरंडक एकांकिका स्पर्धेमध्ये नागठाणे कॉलेजला पाच पारितोषिके मिळविली
Satara News Team
- Mon 21st Nov 2022 07:22 am
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : सांगली येथे अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सांगली आयोजित पीएनजी महाकरंडक एकांकिका स्पर्धेत नागठाणेच्या आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेजने एकूण पाच पारितोषिके प्राप्त केली.सदर एकांकिका स्पर्धेत सांघिक प्रकारामध्ये फराळ या एकांकिकेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. तसेच वैयक्तिक प्रकारामध्ये स्ञी अभिनयास कु.सुजाता सपकाळ हिने 'सई' या पात्राची सर्वोत्कृष्ट भूमिका साकारून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. तर दिग्दर्शन व प्रकाश योजना यांसाठी कु.ऋतुजा पवार हिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.तसेच कु.प्रीती मोहिते हिला पार्श्वसंगीत यांसाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
या अगोदर 'फराळ' एकांकिकेला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत जिल्हास्तरीय व मध्यवर्ती युवा महोत्सव स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.
याप्रसंगी सर्व यशस्वी स्पर्धक व सहकलाकार कु.पुनम मुसळे, कु.सुजाता सपकाळ, कु.दीक्षा कुंभार कु.शितल बिडे,कु.करिष्मा काळभोर कु.संध्या पवार, कु.श्रद्धा यादव, कु.निकिता पवार, प्रिती मोहिते कु.ऋतुजा पवार, जय लोरे, राहुल कुंभार,
एकांकिकेचे दिग्दर्शक मा.नितीन पवार तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष निलाखे व त्यांचे सदस्य डॉ. राजाराम कांबळे, प्रा. रघुनाथ गवळी, प्रा.जयमला उथळे,प्रा. जयसिंग राठोड व प्रा. स्मिता कालभूषण यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगीताई गावडे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ, सहसचिव (अर्थ) प्राचार्य एस.एम.गवळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.अजितकुमार जाधव,सहकारी प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी, ग्रामस्थ इत्यादींनी अभिनंदन केले.
sport
satara
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Mon 21st Nov 2022 07:22 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Mon 21st Nov 2022 07:22 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Mon 21st Nov 2022 07:22 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Mon 21st Nov 2022 07:22 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Mon 21st Nov 2022 07:22 am
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Mon 21st Nov 2022 07:22 am
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Mon 21st Nov 2022 07:22 am
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Mon 21st Nov 2022 07:22 am
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Mon 21st Nov 2022 07:22 am
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Mon 21st Nov 2022 07:22 am













