कराड पोलीसांकडून नियम मोडणाऱ्या लेझर लाईट वाहन आणि 4 डाॅल्बी जप्त.

कराड :  कराड पोलिस अॅक्शन मोडवर असून गणेशोत्सावात नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने डीजेला पूर्णत बंदी असून डाॅल्बीवर आवाजाची मर्यादा आहे. गणेश आगमनालाच कराड पोलिसांनी आवाजाची मर्यादा अोलांडणाऱ्या डाॅल्बी ताब्यात घेतल्याच असून त्यासोबत लेझर लाईटवरही कारवाई केली आहे. त्यामुळे डाॅल्बी आणि लेझर मालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

कराड येथे शांतता कमिटीची बैठक पार पडली होती. या बैठकीत अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. वैशाली कडूकर यांनी डीजेला पूर्ण बंदी असून डाॅल्बीवर आवाजाची मर्यादा असल्याचे सांगितले होते. तसेच लेझर लाईटमुळे डोळ्यांना त्रास होत आहे. या बैठकीला शहरातील तसेच कराड तालुक्यातील अनेक गणेश मंडळे तसेच अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. परंतु, गणेश आगमानाला काही मंडळांनी डाॅल्बी तसेच लेझर लाईट लावल्या होत्या. ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक तैनात केले आहे. या पथकाने कराड शहरात 1 लेझर लाईट लावलेल्या वाहनांवर तसेच 4 डाॅल्बीधारक चालक व मालक यांच्यावर कारवाई केली.

सदरची कारवाई कराडचे उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत  बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त