दबंग, डॅशिंग, पर्सनॅलिटी असणारे सातारचे एसपी समीर शेख
गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणारे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख वाढदिवस विशेषSatara News Team
- Sat 3rd Dec 2022 12:41 pm
- बातमी शेयर करा
3 डिसेंबर 2022 रोजी सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आयपीएस अधिकारी समीर शेख यांचा वाढदिवस. साजरा होत आहे. पोलीस ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात काम करतात तो अधिकारी देखील खमक्याच असावा लागणार! पोलीस अधिकारी खमक्या असला कि त्याच्या नावाची अवैध धंदे चालवणारांच्या गोटात दहशत असते म्हणून डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे हे नक्कीच..
आयपीएस समीर शेख यांचा परिचय..
मुळचे मिरा भाईंदर येथील असणारे समीर शेख यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासून प्रशासकीय सेवेत जाण्याचा ध्यास लागलेल्या समीर शेख यांना खाकी वर्दीची आवड होती. आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून समीर शेख यांनी इलेक्ट्रॉनिक मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे.. चाणाक्ष व हुशार असलेले समीर शेख यांनी आपले भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी खुप मेहनत घेतली आपले शिक्षण पूर्ण होताच त्यांनी यूपीएससीचे मार्गदर्शन व शिक्षण घेण्यासाठी नवी दिल्ली येथे रवाना झाले मुंबईचे माजी पोलीस प्रमुख ज्युलिओ रिबेरो यांच्याकडून मला पोलीस अधिकारी बनून देशसेवा करण्याची प्रेरणा मिळाली. असे समीर शेख नेहमी सांगतात
सन 2016 साली समीर शेख बनले दुसर्या प्रयत्नात आयपीएस अधिकारी. धाडसी व जिगरबाज आयपीएस अधिकारी समीर शेख आपल्या प्रशिक्षण कालावधीत पण अग्रेसर राहीले होते केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 30 ऑक्टोबर 2017 रोजी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये पासिंग आऊट परेड दरम्यान भारतीय पोलीस सेवा (IPS) प्रोबेशनर समीर अस्लम शेख यांचा सत्कार केला.
गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचण्यासाठी पुढाकार
मागच्या महिन्यापासून सातारा जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याने अनेकांनी आपला गाशा गुंडाळला आहे. वारंवार धाडसत्र सुरु असून गुन्हेगार सैरावैरा झाले आहेत.
सदरक्षणाय,खलनिग्रहणाय असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेवून "खल'वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे. अगदी याच पद्धतीने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आपली कार्यपद्धती वापरली असून सर्व सामान्य जनतेच्या मनात वेगळा आदर निर्माण झाला आहे..अत्यंत शिस्तप्रिय व खमक्या आधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीची वाढ झाली असताना गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एका खमक्या अधिकाऱ्याची अत्यंत गरज होती त्यानुसार खमक्या आधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक समीर शेख यांची नियुक्ती काही दिवसांपूर्वी सातारा येथे करण्यात आली.. सातारा जिल्ह्यात समीर शेख हे मायक्रो नियोजन करत असून अवैध धंदे करणाऱ्यांसह गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर आळा बसविण्याचे कार्य हातात घेतले आहे*. अवैद्य धंदेवाल्यांना चांगलाच घाम फोडल्यामुळे मोठ्याप्रमात बोकाळलेल्या अवैद्य धंद्येवाल्याना समुळ नष्ट करण्याचे काम एक तरुण तडफदार ध्येयवादी पोलिस अधिक्षक आपल्या स्टाईलने कामगिरी करत असुन.
सातारचा पदभार घेतल्यापासून सातत्यपूर्ण कामगिरी.
सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक म्हणून रुजू होताच समीर शेख यांनी जोरदार बॅटिंग सुरू केली..वर्षानुवर्षे जनतेच्या डोळ्यादेखत सुरू असलेल्या काळ्या धंद्यांच्या जगाला या अधिकाऱ्याने हादरे दिले आहेत. मटका, जुगार, खासगी सावकारी, ऑनलाइन लॉटरी, हातभट्टी, सामूहिक गुंडगिरी जिल्ह्यात बेकायदेशीर धंदे अवैध गुटखा अवैध दारू असेल . गांजाची लागवड असेल चंदन तस्करी असेल या सगळ्याचा कर्दनकाळ म्हणून समीर शेख यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आमिर मुजावर आणि सात साथीदारांविरुद्ध मोक्का अंतर्गत जबरदस्त कारवाई.
कमी कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे जनसामान्यांत त्यांची प्रतिमा उंचावली आहे....
सातारा जिल्ह्यात सुरू आहे कोंम्बिग ऑपरेशन
सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे जास्तीत जास्त गुन्हे उघड करुन मालमत्तेच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी नाकाबंदी, रात्रगस्त, कोंम्बिग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील आरोपींवर प्रतिबंधक कारण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे निर्देश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस दलातील सर्व ठाणेदार सर्व कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले असून जिल्हा पोलीस दल समन्वय साधून आपापले कर्तव्य बजावताना दिसत आहेत..
अशा या खाकीतल्या जिगरबाज खमक्या पोलीस अधिकाऱ्याला पोलीस मित्र उदय आठल्ये यांचा मनापासून सलाम...
satarapolice
samirshaikh
ips
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 3rd Dec 2022 12:41 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 3rd Dec 2022 12:41 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 3rd Dec 2022 12:41 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 3rd Dec 2022 12:41 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 3rd Dec 2022 12:41 pm
संबंधित बातम्या
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 3rd Dec 2022 12:41 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 3rd Dec 2022 12:41 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 3rd Dec 2022 12:41 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Sat 3rd Dec 2022 12:41 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Sat 3rd Dec 2022 12:41 pm
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 3rd Dec 2022 12:41 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Sat 3rd Dec 2022 12:41 pm









