१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावाSatara News Team
- Mon 27th May 2024 03:30 pm
- बातमी शेयर करा
मुंबई : २००४ साली जर राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर आजपर्यंत ते कायम राहिलं असतं. आज शरद पवार जे सांगतायेत ते धादांत खोटे आहे. मुख्यमंत्रिपद न घेण्यामागे काही ना काही कारण आहे असं सांगत अजित पवारांनी मोठा दावा केला आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. यात अजित पवारांनी सांगितलं की, २००४ बद्दल शरद पवारांनी काही विधान केले, त्यावेळी जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता असं ते बोलले. परंतु हे धादांत खोटे आहे. मी त्यावेळी होतो, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा हे आम्हाला वाटत होतं. त्यावेळी मला मुख्यमंत्रिपदात रस नव्हता. छगन भुजबळ हे मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं, पक्ष स्थापनेपासून भुजबळांनी गावोगावी जात संघटना वाढवण्याचं काम केलं होतं. त्या काळात इतकं वातावरण निर्माण होऊनही राष्ट्रवादीला ५८ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या असं त्यांनी सांगितले. तसेच १९९१ शरद पवारांना संरक्षण मंत्री केंद्रात जायची वेळ आली तेव्हा बहुतांश आम्ही सगळे काँग्रेस आमदार सेवासदनला बसले होते. तेव्हा एकत्र काँग्रेस होती. आमदारांच्या बैठकीत पद्मसिंह पाटलांचं नाव पुढे आलं होतं, त्यावेळी सुधाकरराव नाईकांचं नावही चर्चेत नव्हतं. सुधाकरराव नाईक यांच्या हाताखाली आम्ही सगळ्यांनी काम केले. केंद्रात जाताना शरद पवारांनी पद्मसिंहांना खुर्ची न देता नाईकांना पुढे आणलं आणि सरकार बनवलं. १९९१ नंतर १३-१४ वर्षांनी अशी संधी आली होती तेव्हा कुणी नवखे होते हे म्हणायचं कारण नव्हतं. पण आता काहीपण सांगतायेत असंही अजित पवारांनी म्हटलं.
दरम्यान, नाईकांना मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांनी १ वर्षही साहेबांचं ऐकलं नाही. १७ लोकांना आम्हाला मंत्रिमंडळातून काढलं. तिथून सगळी गडबड झाली. २००४ ला कदाचित हा विचार शरद पवार-प्रफुल पटेल यांच्यात झाला असेल की, १९९१ ला मुख्यमंत्री करून एक वर्षात कुणी ऐकलं नाही आता जर मुख्यमंत्री केले तर आपल्या दोघांना कायम दिल्लीला पाठवतील. त्यामुळे मुख्यमंत्री पद घेतले नसेल. काही ना काही कारण आहे. २००४ ला मुख्यमंत्रिपद घेतले असते तर तिथून कायम राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राहिला असता असा दावा करत अजित पवारांनी आपण पुन्हा जोमाने कामाला लागू. युद्धात आणि तहात दोन्हीत जिंकू असं आवाहन कार्यकर्त्यांना केले.
काहीही झालं तरी विचारधारा सोडणार नाही
निवडणुकीच्या निमित्ताने बराच अनुभव आला, रोज सकाळी १० वाजता भोंगा वाजतो, तो भोंगा वाजला की त्याला उत्तर द्यायचं. देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असताना कुठेतरी जातीपातीचा विचार केला जात होता. अल्पसंख्यांकांना चांगल्या प्रकारे निधी या सरकारने दिलं होतं. वक्फ बोर्डाचे अनेक प्रलंबित प्रश्न आम्ही सोडवले होते. काहीही झालं शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा राष्ट्रवादीनं सोडली नाही, यापुढेही सोडणार नाही विकासपुरुष म्हणून आम्ही मोदींसोबत आलो आहे. कुठल्याही देशाने आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहता कामा नये. आपल्या आजूबाजूचे देश कुठे काही गडबड करणार नाहीत अशी परिस्थिती देशाने तयार केली आहे असं अजित पवारांनी ठाम सांगितले.
भारतीयांची शॉर्टटर्म मेमरी, ३-४ महिन्याचं लक्षात ठेवतात
संविधान वाचवा, लोकशाही वाचवा असं नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं. आम्ही सगळेजण बेंबीच्या देठापासून सांगतोय, संविधान बदललं जाणार नाही. संविधान दिन या सरकारने सुरू केले. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव काँग्रेसनं केला होता. मात्र लोक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ५ वर्ष कितीही काम केले तरी भारतीयांची शॉर्टटर्म मेमरी असते. गेल्या ३-४ महिन्यात काय घडतंय त्यावर विचार केला जातो असं अजित पवारांनी सांगितलं.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Mon 27th May 2024 03:30 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Mon 27th May 2024 03:30 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Mon 27th May 2024 03:30 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Mon 27th May 2024 03:30 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Mon 27th May 2024 03:30 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Mon 27th May 2024 03:30 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Mon 27th May 2024 03:30 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Mon 27th May 2024 03:30 pm
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Mon 27th May 2024 03:30 pm
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Mon 27th May 2024 03:30 pm
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Mon 27th May 2024 03:30 pm
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Mon 27th May 2024 03:30 pm
-
सर्वसामान्य जनतेच्या मते औंध पोलिस ठाण्याचे विद्यमान कारभारी अवैध व्यवसायांच्या बाबतीत गांधारीच्या भुमिकेत
- Mon 27th May 2024 03:30 pm












