फलटण ते रुद्धपुर तीर्थयात्रा म्हणजे मठाधिपती आणि मठपती यांचा संगम साधण्याची अनुप शहा यांची किमया : श्रद्धेय प. पू. कारंजेकर बाबाजी
Satara News Team
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
- बातमी शेयर करा

फलटण : महानुभाव पंथीय आणि जैन धर्मीयांची दक्षिण काशी फलटण ते महानुभाव पंथीयांची उत्तर काशी रुध्दपुर अशा तीर्थयात्रेमध्ये १५० स्त्री - पुरुष भाविकांना एकत्रित सहभागी करुन घेत केलेले आयोजन म्हणजे मठाधिपती आणि मठपती यांचा संगम साधण्याची किमया असून भाविकांना झालेले दर्शन, सेवा पूजेचा लाभ हे अनुप शहा यांच्या धर्मप्रेम, भक्ती, श्रध्देचे अनोखे दर्शन असल्याचे श्रद्धेय प. पू. कारंजेकर बाबाजी यांनी स्पष्ट केले
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा व माऊली फौंडेशन आयोजित दक्षिण काशी फलटण ते उत्तर काशी रुध्दपुर अशा १५० स्त्री - पुरुष यात्रेकरुंना दक्षिण काशी श्री क्षेत्र फलटण ते उत्तरकाशी श्री क्षेत्र रुद्धपुर निघालेल्या तीर्थयात्रेचा शुभारंभ श्री चक्रपाणी मंदिर, फलटण येथे कवीश्वर कुलाचार्य प.पू. श्यामसुंदर शास्त्री विद्वांस बाबाजी, महंत प्रकाश मुनी, महंत मुकुंदराज बिडकर बाबाजी, महंत सुदामराज बाबाजी यांच्या हस्ते पूजा करुन करण्यात आले
अनुप शहा यांनी आतापर्यंत जैन, महानुभाव तीर्थयात्रेचे अनोख्या पद्धतीने आयोजन करुन भाविकांना दर्शन घडविताना समाजातील श्रद्धावान असूनही आर्थिक परिस्थिती किंवा शारिरीक अपंगत्व यामुळे इच्छा असूनही तीर्थयात्रा करु शकत नाहीत अशांना मोफत तीर्थयात्रा घडवून वेगळा उपक्रम राबविला आहे, अन्य राजकीय पक्ष, संघटना, नेते मंडळींनी याप्रमाणे यात्रा नियोजन करुन विविध समाज घटकांना तीर्थ यात्रा घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा श्रद्धेय प. पू. कारंजेकर बाबाजी यांनी व्यक्त केली आहे.
या सर्व यात्रेकरुंना ३ एस.टी. बस द्वारे दौंड पर्यंतचा प्रवास केल्यानंतर दौंड रेल्वे स्टेशन येथे सकल जैन समाज व भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने स्वप्निल शहा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व यात्रेकरुंचे स्वागत करुन यात्रेकरुंना शुभेच्छा दिल्या.रुद्धपुर येथे महंत श्री यक्षदेव बाबाजी, राहुल मुनी शिवनेकर यांनी संपूर्ण गावामध्ये रांगोळी काढून यात्रेकरुंना पुष्पगुच्छ - पुष्पहार देऊन बँड लावून संपूर्ण गावातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढून यथोचित स्वागत केले. त्यानंतर सलग ३ दिवस सर्व स्त्री - पुरुष यात्रेकरुंनी या तीर्थक्षेत्री असलेल्या सुमारे ३५० मंदिरातील स्थानांचे दर्शन घेतले. दि. ५ ऑगस्ट रोजी रुद्धपुर येथील प्रमुख मंदिर राजमठ येथे सहस्र दीपक आरती सोहळा संपन्न केला.
दि. ६ ऑगस्ट रोजी महंत श्री कारंजकर बाबाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष गोपीराज बाबाजी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यात्रा यशस्वी करण्यासाठी सेवासमर्पण ग्रुपचे सर्व साधू मंडळी हरिदास शास्त्री विद्वांस, भरत दादा विद्वांस, महेंद्रमुनी बिडकर, भरतदादा जामोदेकर, श्रीनिवास विद्वांस, अक्षय विध्वंस, अखिल भारतीय महानुभाव भोपे पुजारी महासंघाचे अजित मठपती, दिलीप मठपती, रमेश मठपती, अक्षय भोसले, पितांबर भोसले, विशाल गणदास, दत्तराज खेडेकर यांच्यासह सर्वांनीच परिश्रम घेतले.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 10th Aug 2023 03:31 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 10th Aug 2023 03:31 pm