दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
Satara News Team
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा नगर पालिकेतील हद्दवाढीनंतर नगरसेवक संख्या ३९ वरून ५० झाली असली तरी शहरातील अनेक महत्त्वाच्या परिसरांना अद्याप पुरेशा सुविधा मिळाल्या नाहीत. योग्य नियोजन झाले असते तर साताऱ्यात तीन नगराध्यक्ष निर्माण झाले असते व विकासाला गती मिळाली असती. दोन्ही राजांविरुद्ध लोकांची नाराजी प्रचंड आहे. निवडणुकीच्या निमित्ताने लोकांची खदखद उफाळून आली असून २ तारखेला मतदानातून लोक याची नक्कीच प्रचिती देतील, असा विश्वास सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार शरद काटकर यांनी व्यक्त केला.
शहरात ठिकठिकाणच्या प्रचारदौऱ्यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद काटकर म्हणाले, शाहूपुरी, शाहूनगर परिसर नगरपंचायतीत रुपांतरित झाला असता तर विकासाला उभारी मिळाली असती.
शाहूनगर ग्रामपंचायत हा त्याकाळचा अॅक्टिव्ह भाग असून येथे नागरी सुविधा चांगल्या प्रमाणात आहेत. गडकर आळी, सैदापूर, कोंडवे ते वाढे फाटा असा विस्तृत नागरी परिसर होता. येथे नगरपंचायत झाल्यास विकासाचा निधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला असता. याचप्रमाणे विलासपूर, संभाजीनगर, कोडोली आणि खिंडवाडी असा त्रिशंकू परिसर एकत्र करून स्वतंत्र नगरपंचायत झाली असती तर या भागालाही स्वतंत्र नगराध्यक्ष मिळाला असता आणि विकासाला गती मिळाली असती.
कास तलावाची पाणीपातळी वाढलेली असून सायफन पद्धतीने शाहूपुरीपर्यंत, अगदी चौथ्या मजल्यापर्यंतही पाणी पोहोचू शकते. परंतु यासाठी आवश्यक ते प्रयत्न येथील आमदार-खासदारांनी केले नाहीत, असा आरोपही काटकरांनी केला. निधी उपलब्ध असूनही इच्छाशक्ती नसल्याने साताऱ्याचा विकास थांबला. बारामतीसारखी प्रगती साताऱ्यालाही शक्य होती, असे शरद काटकर म्हणाले.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
संबंधित बातम्या
-
हातगेवर विकास सेवा सोसायटीत कर्जप्रकरणी फसवणुकीचा आरोप; सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा यांच्याकडे तक्रार दाखल
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sun 30th Nov 2025 02:00 pm
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Sun 30th Nov 2025 02:00 pm












