संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम संपणार? सुनील राऊत दिल्लीत; भाजप नेत्यांची घेणार भेट

मुबंई  -शिवसेना खासदार संजय राऊत  यांना पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सध्या ते आर्थररोड जेलमध्ये आहेत. मागील एक महिन्यापूर्वी संजय राऊत यांनी ईडीने अटक केली, तेव्हापासून ते कोठडीत आहे. यात अद्याप त्यांचा जामीन मंजूर झाला नसल्याने त्यांचा भाऊ सुनील राऊत जामिनासाठी प्रयत्न करत आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या मातोश्री या निवासस्थानावर झालेल्या घडामोडीनंतर राज्याचे राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याचे संकेत मिळत आहेत. कारण ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सुटकेसाठी उद्धव ठाकरे आणि राऊत कुटुंबीयांकडून भाजपसोबत तडजोड करत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या शेवटच्या प्रयत्नाला यश मिळणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. आज उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांना मातोश्रीवर तातडीने बोलावून घेतले. सुनील राऊत यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेत चर्चा केली, यानंतर थेट त्यांनी दिल्ली गाठले आहे. संजय राऊतांच्या या प्रकरणातील सुटकेसाठी सुनील राऊत दिल्लीत वरिष्ठ वकिलांशी चर्चा करणार असल्याची चर्चा आहे.

सुनील राऊत हे दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेत संजय राऊतांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत काल रात्री उशीरा मातोश्रीवर दाखल होत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आलेय. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी ते आता माझ्या राऊत कुटुंबाचे देखील प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी मला भेटायला बोलावले होते. यावेळी त्यांनी राऊत कुटुंबियांची विचारपूस केली अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, आपल्या भावाच्या सुटकेसाठी राऊत आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. तेव्हाच महाराष्ट्र आणि दिल्लीतील काही भाजप नेत्यांशीही बोलणे झाल्याची शक्यता आहे. त्यामुळेच सुनील राऊत हे दिल्लीत पोहचले आहेत. याच दरम्यान महाराष्ट्रातील एक 'ताकदवान' नेताही ठाकरेंच्या मदतीला धावून आल्याची चर्चा आहे. भाजपचा हा नेता आणि उद्धव ठाकरे यांच्या ‘युती’मुळे संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आता भाजप नेत्यांपुढे हात टेकून आपल्या नेत्याला सुखरूप बाहेर काढणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला