एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
Satara News Team
- Fri 16th May 2025 06:10 pm
- बातमी शेयर करा
फलटण : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर मला मच्छर म्हणतात, डास म्हणतात, ढेकूण म्हणतात, काळा म्हणतात, मात्र मी कसलाही असलो तरी मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि या मतदारसंघाचा मी आमदार आहे. त्यामुळे पाण्याचा संघर्ष असो किंवा या मतदारसंघातील कोणताही विकासाचा साठी संघर्ष असो मी जनतेसाठी कायमस्वरूपी झिजत राहणार. त्यामुळे मला मच्छर म्हणणाऱ्यांना नाना पाटेकरचा डायलॉग आठवण देतो एक मच्छर आदमी को.... पुढे काय आहे ते सांगण्याची गरज नाही, असे सांगत रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता फलटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर तोफ डागली आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून कायमस्वरूपी व्यक्ती दोष करण्यात आला आहे. माजी खासदार रणजीत निंबाळकर यांच्यावर देखील व्यक्तिगत पातळीवरचे आरोप त्यांच्या विरोधात जे कोणी जाईल. त्यांच्या राजकारणातल्या ट्रॅकवर जो कोणी येईल त्यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर आरोप हा रामराजेंचा स्वभाव आहे. मात्र आम्ही त्यांच्यावर कधी टीका टिपणी करणार नाही. आम्ही आमच्या विकास कामांना आणि आमच्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी झटणारे प्रतिनिधी आहोत. या तालुक्याचा एक इतिहास आहे परंपरा या तालुक्यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांनी तालुक्यासाठी योगदान दिलेला आहे. रामराजे नाईक निंबाळकर देखील या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आहे. त्यामुळे त्यांनी देखील आता भान ठेवणे गरजेचे आहे. कारण या तालुक्यात आता एकमेव तेवढेच ज्येष्ठ नेते शिल्लक राहिले आहेत. पाण्याचा राजकारण करून लोकांना झुंजवत ठेवणं आता बंद करा असा सल्ला देखील फलटणचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सचिन पाटील यांनी रामराजे यांना सल्ला दिला आहे. त्यामुळे आता अजित पवार गटातील या दोन्हीही नेत्यांमध्ये असणारा हा संघर्ष पुन्हा एकदा पहावयास मिळाला आहे.
स्थानिक बातम्या
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 16th May 2025 06:10 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 16th May 2025 06:10 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 16th May 2025 06:10 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 16th May 2025 06:10 pm
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Fri 16th May 2025 06:10 pm
संबंधित बातम्या
-
प्रशांत खुसे-पाटील यांच्या रुपाने खटाव तालुक्याला मिळणार युवा नेतृत्व
- Fri 16th May 2025 06:10 pm
-
साताऱ्यात शिवसेना (उबाठा) आंदोलनाचा फुसका बार
- Fri 16th May 2025 06:10 pm
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Fri 16th May 2025 06:10 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Fri 16th May 2025 06:10 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Fri 16th May 2025 06:10 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Fri 16th May 2025 06:10 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Fri 16th May 2025 06:10 pm













