मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन

13 रोजी बच्चु कडू यांच्या उपस्थितीत होणार आंदोलन, कराड येथे विभागीय कार्यकर्ता मेळावा, संताजी-धनाजी पुरस्काराचे वितरण

कराड . शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव व दिव्यांगाना 6 हजार रूपये पेन्शन या मागण्यांसाठी मंगळवार दि. 13 रोजी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच कराड येथे विभागीय कार्यकर्त्यांचा मेळावा व संताजी-धनाजी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाअध्यक्ष मनोज माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.


 माजी मंत्री बच्चूभाऊ कडू हे मंगळवारी रक्तदान आंदोलन व मेळाव्याच्या निमित्ताने कराड व सातारा दौऱ्यावर येत आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज माळी, महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा मनिषा चव्हाण, पाटण तालुका अध्यक्ष शुभम उबाळे, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या जिल्हाअध्यक्षा सुरेखा सुर्यवंशी, आक्काताई ढेबे, माधुरी बावधने, बंटी मोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.


 मनोज माळी म्हणाले की, मंगळवारी दुपारी 2 वाजता बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत टाऊन हॉल येथे विभागीय कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी सातारसह पुणे, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्यात संघटनेसाठी प्रामाणीक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संताजी-धनाजी पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. सरकारने जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी तसेच शेत मालाला हमीभाव द्यावा व दिव्यांगाना 6 हजार रूपये पेन्शन द्यावी या मागण्यांसाठी बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहारच्या वतीने रक्तदान आंदोलन करण्यात येत आहे. रायगडपासून या आंदोलनास सुरवात झाली आहे. काही दिवसांपुर्वी राज्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर मशाल मोर्चा काढण्यात आला होता. मात्र तरीही सरकारला जाग आलेली नाही. त्यामुळे 14 राजी राज्यातील सर्व मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे


. बच्चूभाऊ कडू 13 रोजी कराड व सातारा दौऱ्यावर येत असल्याने 13 रोजी दुपारी कराडचा मेळावा झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजता मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मनोज माळी यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त