साताऱ्यात शिवसेना (उबाठा) आंदोलनाचा फुसका बार

माझं कुंकू, माझा देश आंदोलनाला कार्यकर्तेच मिळेनात

सातारा : पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकारविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, सातारा शहरात या आंदोलनाचा फुसका बार निघाला असून माझं कुंकू, माझा देश आंदोलनाला कार्यकर्तेच मिळत नसल्याचे चित्र साताऱ्यात दिसून आले.

       आज सातारा शहरात शिवतीर्थ परिसरात उबाठा गटाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाकरिता फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते उपस्थित असल्याचे चित्र दिसून आले. शिवसेनेतील फुटीनंतर साताऱ्यात उद्धव ठाकरे गटाला उतरती कळा लागली असून पदाधिकारी पक्ष संघटनेसाठी साधे प्रयत्न देखील करताना दिसून येत नाहीत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असून उबाठा गटाचा जिल्ह्यात चेहराच नसून उपनेते नितीन बानगुडे-पाटील व जिल्हाप्रमुख हर्षल कदम कितपत खिंड लढवणार हा एक प्रश्नचं आहे. 

  दरम्यान, आज झालेल्या आंदोलनाला फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कायकर्ते असल्याने आंदोलनाचा पुढाकार कोणी घ्यायचा ? यावरुन पक्षात मतभेद असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.    

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला