कराड दक्षिणच्या डोंगरी भागात उन्हाळी पावसाची हुलकावणी; धरणाच्या पाण्याची पातळी घटली

सातारा : कराड दक्षिणेच्या डोंगरी भागात यावर्षी उन्हाळी पावसाने हुलकावणी दाखवल्याने डोंगरी विभागातील जिंती अकाईवाडी या सह परिसरातील सर्वच धरणातील पाण्याची पातळी पातळीने तळ गाठला असून शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून ऊसाची शेती अडचणीत आली आहे.
 गेल्या दोन वर्षात कराड दक्षिणच्या डोंगरी भागात पिण्याच्या पाण्याचा अथवा शेती पाण्याचा प्रश्न फारसा गंभीर बनला नव्हता पण यावर्षी उन्हाची तीव्रता प्रचंड असल्याने धरणातील पाणीसाठा विविध कारणासाठी वापर झाल्याने तो संपुष्टात आला असून विभागातील जिंती अकाईवाडी या सह परिसरातील छोटी मोठी धरणे पाझर तलाव आता कोरडे ठणठणीत पडले असून जिंती व आकाईवाडी धरणात नाममात्र पाणीसाठा राहिला आहे हा पाणीसाठा सध्या जनावराच्या व पिण्याच्या पाण्यासाठीच वापरला जात आहे अजून काही दिवस पावसाने ओढ दिली तर ही दोन्ही धरणे कोरडी ठणठणीत पडतील व पिण्याच्या पाण्या सह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल.
 सध्या विभागात मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता असून विभागातील ऊस शेती पाणी नसल्याने पूर्णतः धोक्यात आली असून उसाने आपला हिरवा रंग बदलून वाळल्याने त्यांने पिवळा रंग धारण केला आहे त्यातच यावर्षी व उन्हाळी पावसाने हुलकावणी दाखवल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे अवकाळी पाऊस अपवाद वगळता काही ठिकाणी पडला असला तरी त्यामुळे शेती पाण्याचा प्रश्न सुटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली नसल्याने शेती अधिकच अडचणीत आली आहे.

 विभागातील येवती धरण वगळता इतर धरणातील पाण्याचे नियोजन म्हणावेसे झाले नसल्याने येळगाव येणपे यासह धरणात पाणी उपलब्ध असतानाही या धरणातील पाणी शेती वापरासाठी सोडले नसल्याने या विभागातील ही शेतीला शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला