फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
Satara News Team
- Mon 31st Aug 2026 07:28 pm
- बातमी शेयर करा
फलटण : जिल्हा रुग्णालयाच्या अखत्यारितील अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची मालिका सुरूच असून, आता डॉ. राजेंद्र रूपनवर प्रकरणी फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी निलंबित केले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे वर्षभरात जिल्हा आरोग्य यंत्रणेतील चार वर्ग-एक अधिकाऱ्यांसह आठ जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.
डॉ. मदने यांच्या प्रशासकीय कार्यकाळातील गंभीर घटना, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असंवेदनशील व कठोर संवाद तसेच सौजन्यपूर्ण वर्तनाचा अभाव आदी बाबी आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा आयुक्तांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ (१)(अ) मधील तरतुदीनुसार ३० ऑगस्ट रोजी डॉ. मदने यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
फलटणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी शस्त्र परवान्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्राच्या प्रकरणावरून आपल्यावर दबाव आणल्याचा तसेच वरिष्ठांकडून त्रास होत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर डॉ. रूपनवर यांच्या तक्रारीवर जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती नेमली होती. पुढे डॉ. रूपनवर यांनी डॉ. मदने यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यावरही हस्तक्षेप व त्रासाचे आरोप केले होते. या आरोपांबाबतची वस्तुस्थिती संबंधित चौकशी व कायदेशीर प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, वर्षभरात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल खाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चांदसाब शिकलगार आणि आता डॉ. लीला मदने अशा चार वर्ग-एक अधिकाऱ्यांवर विविध कारणांनी निलंबनाची कारवाई झाली आहे.
फलटणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी शस्त्र परवान्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्राच्या प्रकरणावरून आपल्यावर दबाव आणल्याचा तसेच वरिष्ठांकडून त्रास होत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर डॉ. रूपनवर यांच्या तक्रारीवर जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती नेमली होती. पुढे डॉ. रूपनवर यांनी डॉ. मदने यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यावरही हस्तक्षेप व त्रासाचे आरोप केले होते. या आरोपांबाबतची वस्तुस्थिती संबंधित चौकशी व कायदेशीर प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे.
२७ ऑगस्ट रोजी डॉ. रूपनवर यांनी मुंबईतील सायन परिसरातील हाय व्होल्टेज टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते. त्यानंतर आता डॉ. मदने यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने फलटण उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय घडामोडींना गंभीर वळण मिळाले आहे. निलंबन काळात डॉ. मदने यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, सोलापूर निश्चित करण्यात आले असून त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्थानिक बातम्या
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Mon 31st Aug 2026 07:28 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Mon 31st Aug 2026 07:28 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Mon 31st Aug 2026 07:28 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Mon 31st Aug 2026 07:28 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Mon 31st Aug 2026 07:28 pm
संबंधित बातम्या
-
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Mon 31st Aug 2026 07:28 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Mon 31st Aug 2026 07:28 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Mon 31st Aug 2026 07:28 pm
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 31st Aug 2026 07:28 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 31st Aug 2026 07:28 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 31st Aug 2026 07:28 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 31st Aug 2026 07:28 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Mon 31st Aug 2026 07:28 pm












