सातारा जिल्ह्यातील कोयना धरणांतर्गत पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या संततधार पावसामुळे धरण पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ
Satara News Team
- Tue 12th Jul 2022 06:16 am
- बातमी शेयर करा
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणांतर्गत पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या संततधार पावसामुळे धरण पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ सुरू आहे.धरणात पाण्याची आवक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ३०,०६५ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. मागील चोवीस तासांत २.५९ टीएमसी पाण्याची आवक झाली असून पाणीउंचीत साडेसहा फुटांनी वाढ झाली आहे . धरणात सध्या एकूण १९.०४ टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्त साठा १४.०४ टी. एम. सी. इतका आहे.
पाटण : सातारा जिल्ह्यातील कोयना धरणांतर्गत पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या संततधार पावसामुळे धरण पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ सुरू आहे.धरणात पाण्याची आवक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ३०,०६५ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. मागील चोवीस तासांत २.५९ टीएमसी पाण्याची आवक झाली असून पाणीउंचीत साडेसहा फुटांनी वाढ झाली आहे . धरणात सध्या एकूण १९.०४ टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्त साठा १४.०४ टी. एम. सी. इतका आहे. कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा,महाबळेश्वर आदी सर्वच ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे . मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सायंकाळी पाच या चोवीस तासांतील व एक जूनपासून आत्तापर्यंतचा एकूण पाऊस कंसात पुढीलप्रमाणे कोयना १३८ मिलिमीटर ( ७२४ ) मिलिमीटर , नवजा २०६ ( ९३३ ) मिलिमीटर व महाबळेश्वर १७५ ( ८८५ ) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे . धरणाची एकूण स्थिती लक्षात घेता येथे एकूण पाणीसाठा १९.०४ टी. एम. सी., त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १४.०६ टी. एम. सी. , पाणीउंची २०५३.१ फूट , जलपातळी ६२५.७८० मीटर इतकी झाली आहे . १०५.२५ टी. एम. सी. पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे ८६.२१ टी. एम. सी. पाण्याची गरज आहे . त्यासाठी जुलै महिन्यासह आगामी ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी चार हजार मिलिमीटर पावसाची गरज आहे . धरणाच्या पूर्वेकडे सिंचनाची मागणी असल्याने कोयना धरण पायथा वीजगृहातील जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत होते . परंतु आता पूर्वेकडील विभागात पाऊस सुरू झाल्याने कोयना नदी पाणी पातळीत वाढ झाल्याने कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे . दरम्यान सध्या तालुक्यातील बहुतांशी भागात अपेक्षित पाऊस पडत असल्याने कोयनेसह अंतर्गत छोट्या, मोठ्या नद्या , नाले, ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे .
#SATARARAINFALL
#SATARAMOSOON
#SATARAKOYANA
#MAHABELSHWARMRAIN
#SATARANEWS
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 12th Jul 2022 06:16 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Tue 12th Jul 2022 06:16 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 12th Jul 2022 06:16 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Tue 12th Jul 2022 06:16 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 12th Jul 2022 06:16 am
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Tue 12th Jul 2022 06:16 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 12th Jul 2022 06:16 am
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Tue 12th Jul 2022 06:16 am
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Tue 12th Jul 2022 06:16 am
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Tue 12th Jul 2022 06:16 am
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Tue 12th Jul 2022 06:16 am
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Tue 12th Jul 2022 06:16 am










