जावळीत आ.शिवेंद्रराजे गट व आ शशिकांत शिंदे गट परस्पराविरोधात भिडणारच!

MLA Shivendra Raje group and MLA Shashikant Shinde group will fight against each other in Jawali!
मेढा नगरपंचायतीमध्ये पक्ष पातळीवर निवडणूक होणार की ही स्थानिक आघाडी याकडे देखील आता सर्व मेढा इच्छुक उमेदवारांसह मतदारांची लक्ष लागले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजप पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांना आता आगामी जावळी तालुक्यातल्या निवडणुका व इतर त्यांच्या मतदारसंघातल्या निवडणुका या पक्ष पातळीवर लढवल्या जाणार की स्थानिक आघाड्यांवर लढवणार यावर उमेदवारांचे भवितव्य। ठरणार आहे. आमदार शिवेंद्रराजे सांगतील तेच चिन्ह, सांगतील तीच आघाडी, हे प्रमाण मानून त्यांचे कार्यकर्ते देखील शिवेंद्रराजे यांच्या आदेशावर अवलंबून आहेत. त्यामुळे विरोधी शिवसेना राष्ट्रवादी व अपक्ष नेमकं काय निर्णय घेणार यावर आपली राजकीय रणनीती ठरवणार आहेत असे बोलले जात आहे.

मेढा : सध्या जावळी तालुक्याचा राजकारणाचा केंद्रबिंदू मेढा नगरपंचायत असल्याने तालुक्याचे ठिकाण म्हणून मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गट व आमदार शशिकांत शिंदे गट हे गेल्या सहा महिन्यापासून या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.इथे काही दिवसातच या निवडणुकीचा धुराळा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवरच मेढा नगरपंचायतीच्या प्रत्येक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या तिन्ही पक्षाच्या माध्यमातून नेते व त्यांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाला लागला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. जावळी तालुक्यातील व नगरपंचायती यासह पंचायत समिती या राजकारणाच्या केंद्रबिंदूच्या अवतीभवती फिरत असतो. नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाचताच मेढ्यामध्ये राजकारणाला गती आली आहे. जो तो इच्छुक उमेदवार स्वतःच्या प्रभागामध्ये सेल्फ लॉन्चिंग करण्यास सुरुवात झाली आहे. जावळी साताऱ्याचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी लगभग सुरू केली आहे. तर आमदार शशिकांत शिंदे गट ऑल रेडी शिवेंद्रराजे यांच्या गटाला पराभूत करण्यासाठी आता फक्त निवडणुकीची औपचारिकताच बाकी आहे असें बोलू लागला आहे. त्यामुळे दोन्ही गटातून इच्छुक उमेदवारांनी आपल्या नेत्यांचा आशीर्वाद घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. मेढा येथील स्थानिक मुद्द्यांवर व विकासाच्या मुद्द्यावरच आजपर्यंत निवडणुका लढल्या गेल्या. आता या निवडणुका वर्चस्व कोणत्या नेत्याचं यावर लढल्या जाणार आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील मेढा नगरपंचायतीमध्ये जोरदार लक्ष घातले असल्याचे बोलले जात आहे. तर होम ग्राउंड जावळी तालुक्याचे आमदार म्हणून शशिकांत शिंदे यांच्याशी विधानसभेपासून जिल्हा बँकेपर्यंत व सोसायटी पर्यंत टसल देणारे शिवेंद्रराजेंनी देखील शशिकांत शिंदे यांच्या गटाला पराभूत करण्यासाठी जशी यापूर्वी फिल्डिंग लावली होती तशी मेढा नगरपंचायतीला देखील स्वतः लक्ष घालून शिवेंद्रराजे यांनी फिल्डिंग लावला असल्याची बोलले जात आहे. मेढा नगरपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित असल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे. मात्र कोठ्यावधी रुपयाचा विकास केला असे सत्ताधारी म्हणत आहेत हा विकास फक्त शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून झाला असल्याची सत्ताधारी सांगतात तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आम्ही विकास दिला म्हणूनच हा विकास झाला असे शिवसेनेचे नेत्यांसह कार्यकर्ते भर चौकात बोलून दाखवतात. कुठल्या पक्षाने कुठल्या नेत्याने विकास केला हे निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे व त्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. प्रभाग रचना मतदार यांच्याशी हितगुज व संपर्क साधला असता मतदार म्हणतात निवडणुकीत फक्त पाणीपुरवठा रस्ते दळणवळण आहे. याबाबत आश्वासन दिली जातात निवडून आल्यावर मात्र संबंधित नगरसेवक मेहरबान किती सक्रिय प्रत्यक्षात असतो. हे त्याचं कार्य दिसूनच येत असते त्यामुळे यावेळी आता शब्दच घेणार मगच त्याला मतदान करणार असा चंग देखील मतदारांनी बांधला आहे. दरम्यान काही कमिशन खाऊ नगरसेवक नगरसेवकांचा यावेळी करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचेही मतदार सांगतात. हे निवडणुकीमध्ये पडल्यानंतरच दिसून येणार. पाच वर्षात सत्तेवर असलेल्या व विरोधी बाकावर बसलेला नगरसेवकांपैकी कोण, कोण पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरणार याकडे देखील आता मेढा नगरी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. कित्येक दिवसापासून मेढा, नगरपंचायतीमध्ये निवडणुकीला आपण उभे राहायचे असे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले पुन्हा निवडणूक पुढे जाते की काय या संभ्रमा अवस्थेत असल्याने असे इच्छुक नेते देखील आता बुचकळ्यात पडले आहेत. सत्ताधारी गट म्हणून पांडुरंग बापू जवळ यांनी नगराध्यक्ष पदाची कारकीर्द यशस्वी केली. मात्र निम्म्या नगरसेवकांकडून त्यांना भलेही साथ मिळाली नसली तरी विरोध मात्र कायम राहिला आहे. मात्र आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून बाकी नगरसेवकांची मोट बांधण्यासाठी सत्ताधारी पांडुरंग बापू जवळ हे यशस्वी ठरले आहेत. आता विरोधामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या नगरसेवक या निवडणुकीत विरोधी भाजप पक्षाच्या विरोधात काय पावलं उचलणार याकडे देखील आता लक्ष लागून राहिलेआहे. या निवडणुकीत आता जुन्या नव्या इच्छुक उमेदवारांचा चांगलाच कस लागणार आहे.या निवडणुकीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे, अमित कदम, शिवसेनेचे एकनाथ ओंबळे, पार्टे गुरुजी,भाजपचे विकास देशपांडे, तसेच राष्ट्रवादीचे काही मेढा नगरीमधील मातब्बर नेते कांतीभाई देशमुख या नेत्यांचा ही निवडणूक यशस्वी पार करण्यासाठी व आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी कस लागणार.मेढा नगरपंचायतीमध्ये पक्ष पातळीवर निवडणूक होणार की ही स्थानिक आघाडी याकडे देखील आता सर्व मेढा इच्छुक उमेदवारांसह मतदारांची लक्ष लागले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजप पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांना आता आगामी जावळी तालुक्यातल्या निवडणुका व इतर त्यांच्या मतदारसंघातल्या निवडणुका या पक्ष पातळीवर लढवल्या जाणार की स्थानिक आघाड्यांवर लढवणार यावर उमेदवारांचे भवितव्य। ठरणार आहे. आमदार शिवेंद्रराजे सांगतील तेच चिन्ह, सांगतील तीच आघाडी, हे प्रमाण मानून त्यांचे कार्यकर्ते देखील शिवेंद्रराजे यांच्या आदेशावर अवलंबून आहेत. त्यामुळे विरोधी शिवसेना राष्ट्रवादी व अपक्ष नेमकं काय निर्णय घेणार यावर आपली राजकीय रणनीती ठरवणार आहेत असे बोलले जात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांच्या विरोधात ज्ञानदेव रांजणें व शिवेंद्रराजे यांनी ज्या पद्धतीने निवडणूक यंत्रणा राबवली होती त्यातूनच सावध पवित्रा घेत आमदार शशिकांत शिंदे यांनी आता आगामी राजनीती व राजकीय डावपेच ऑलरेडी आखून ठेवले आहेत. आता तालुक्यातील कोणतीही निवडणूक ही आजी माजी आमदारांच्या गटातच पहावयास मिळणार हे मात्र कळ्या दगडावरील रेष बोलली जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त