संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी

दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना ‘शतक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’  हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, या चित्रपटामुळे संघाचे काम आणि विचार अधिक चांगल्या प्रकारे समजतील.नितीन गडकरी म्हणाले की, “स्वयंसेवक म्हणून मला अनेकदा असे वाटते की संघाबद्दल लोकांच्या मनात जी प्रतिमा आहे आणि प्रत्यक्ष वास्तव यात फरक आहे. त्यामुळे संघाचे विचार, त्याग, समर्पण आणि देशभक्ती जवळून समजून घ्या. आदिवासी भागातील सेवा कार्य, सहकार चळवळ, शिक्षण क्षेत्रातील उपक्रम अशा अनेक कामांचा मोठा पट या माध्यमातून दिसेल. देशाच्या प्रगतीत संघाचा मोठा वाटा आहे. या शताब्दी वर्षानिमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन संघ समजून घ्यावा आणि त्याची विचारधारा जाणून घ्यावी. हा चित्रपट जरूर पाहा आणि संघ समजून घेण्याचा प्रयत्न करा.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “या १०० वर्षांत संघाने लाखो तरुणांना देशभक्तीची प्रेरणा दिली आहे. मी देखील त्या स्वयंसेवकांपैकी एक असल्याचा मला अभिमान आहे. आज आपण १०० वर्षांचा टप्पा गाठला असला तरी काम अजून पूर्ण झालेले नाही. भारताला जगात अग्रस्थानी नेणे हे आपले ध्येय आहे. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देश सर्वोच्च स्थानी पोहोचावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.”

हिंदुत्वाबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, “आपण दलित, वंचित आणि गरिबांच्या उन्नतीसाठी काम करतो. हिंदुत्व हे जातीय किंवा सांप्रदायिक नाही. ते कोणत्याही एका धर्माशी जोडलेले नाही. ती एक जीवनशैली आहे. सर्व धर्मांचे लोक भारतीय असू शकतात. आपली भारतीय ओळख ही आपल्या इतिहास, संस्कृती आणि परंपरेतून तयार झाली आहे. हीच प्रेरणा संघाने दिली आहे.”

‘शतक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट संघाचा विचारप्रवास, सामाजिक उपक्रम आणि देशसेवा यांचा आढावा घेतो. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनंतर या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला