पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
प्रशासनाला जाग कधी येणार?आशपाक बागवान
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसराची जुगार अड्ड्यांमुळे झालेली नकारात्मक चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच आता गोरेगाव-वांगी गावाचे नावही अशाच कारणांमुळे चर्चेत येऊ लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांबाबत परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगत असून या प्रकारामुळे गावाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गोरेगाव-वांगी येथे सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यांवर केवळ गावातीलच नव्हे तर परिसरातील विविध गावांमधूनही उच्चभ्रू आणि व्हाईट कॉलर चे लोक येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून युवक वर्गावर चुकीचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे या प्रकाराबाबत गावात उघडपणे चर्चा होत असताना संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे "नेमके कोणाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे?" असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. गावातील सुजाण नागरिकांनी अनेकदा नाराजी व्यक्त करूनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याने संताप वाढत आहे.
गावाची ओळख विकास, शिक्षण आणि सामाजिक एकोप्यासाठी व्हावी अशी अपेक्षा असताना जुगार अड्ड्यांमुळे नाव चर्चेत येणे ही दुर्दैवी बाब असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. अशा प्रकारांमुळे गावाची प्रतिमा मलिन होत असून भविष्यात गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांचे म्हणणे आहे की, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि आवश्यक ती कारवाई करावी. अन्यथा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुसेसावळी पाठोपाठ गोरेगाव-वांगीचे नावही जुगार अड्ड्यांमुळे चर्चेत येत असताना, संबंधित यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहणार का? की नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्षच सुरू राहणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रशासनाला जाग कधी येणार हा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक बातम्या
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
संबंधित बातम्या
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Tue 14th Jul 2026 04:46 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Tue 14th Jul 2026 04:46 pm












