शिंगणापूर ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी

आंधळी : मौजे शिखर शिंगणापूर ता.माण या गावामध्ये भारत देशाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली.
 ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले.या कार्यक्रमासाठी दलित समाजातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच सौ.सारिका शेंडे उपसरपंच राजेंद्र पिसे, माजी सरपंच राजाराम बोराटे, माजी सरपंच सौ.रेश्मा शिंगाडे, ग्रा.सदस्य सौ.अनघा बडवे, सौ.वर्षा दणाने, शशिकांत भोसले, शंकर तांबवे, माजी चेअरमन दादासाहेब शिंगाडे, फौजी माहुल कारंडे, पोलीस पाटील संतोष बोराटे, डी के बडवे, देवा भोसले, बापू दणाने, शिवराज शेंडे, महादेव दणाने, तानाजी खंदारे, ग्रामपंचायत कर्मचारीसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

डॉ.आंबेडकरांनी समाजातील घाटकांना  त्रिसूत्री कार्यक्रमाची शिकवण दिली: राजाराम बोराटे ( माजी सरपंच शिंगणापूर)
 शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसूत्रीचा अवलंब करा. आपला सर्वांगीण विकासाबरोबर समाजातील गोरगरीब लोकांना संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले. मागासवर्गीय लोकांवर मिळणारी तुच्छ वागणुकीस भेदण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.भारतीय  राज्यघटनेचे शिल्पकार व संविधान निर्माण करणाऱ्या महामानवाला त्रिवार अभिवादन .त्याचे  कार्य हे भारत देशापुरते नसून ते जागतिक पातळीवर आज ही दिसून येत आहे. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला