दुचाकीवरून चाललेल्या दीशाचा अपघातच्या धक्क्याने तिच्या आजोबानी सोडला प्राण...अंत्यसंस्कारावेळी हृदयविकाराने निधन
Satara News Team
- Wed 6th Dec 2023 12:41 pm
- बातमी शेयर करा
सातारा : संगमनगर येथील रस्त्यावर रविवारी ट्रकने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दिशा घोरपडे या युवतीचा मृत्यू झाला. यानंतर घोरपडे कुटुंबियांवर शोककळा पसरली असतानाच त्यांना आणखी धक्का सहन करावा लागला. दिशाच्या मृत्यूच्या धक्क्याने आजोबा दत्तात्रय मारूती शिंदे (वय 50 रा. सोनगाव सं. निब ता. सातारा) यांनीही प्राण सोडला. त्यांचे दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी हृदयविकाराने निधन झाले.
सातारा – कोरेगाव रस्त्यावर संगमनगर येथे दिशाला ट्रकने चिरडल्याने तिचा मृत्यू झाला. दिशा ही दत्तात्रय शिंदे यांच्या सख्ख्या चुलतभावाच्या मुलीची मुलगी होती. दिशा वारंवार आजोळी सोनगाव येथे येत होती. शनिवारी ती आल्यानंतर दत्तात्रय शिंदेंनाही भेटली होती. दिशा त्यांच्यासह सर्वच कुटुंबाची लाडकी होती. तिच्या अचानक मृत्यूमुळे आजोळही शोकसागरात बुडाले. दिशावर शिरढोण या तिच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दत्तात्रय शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. दिशा आजी व आजोबांकडे नेहमी वास्तव्यास असायची. घोरपडे व शिंदे कुटुंबावर कोसळलेल्या हृदयद्रावक प्रसंगांमुळे सोनगाव व शिरढोण या गावावर शोककळा पसरली आहे
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 6th Dec 2023 12:41 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 6th Dec 2023 12:41 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 6th Dec 2023 12:41 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 6th Dec 2023 12:41 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Wed 6th Dec 2023 12:41 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Wed 6th Dec 2023 12:41 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Wed 6th Dec 2023 12:41 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Wed 6th Dec 2023 12:41 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Wed 6th Dec 2023 12:41 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Wed 6th Dec 2023 12:41 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Wed 6th Dec 2023 12:41 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Wed 6th Dec 2023 12:41 pm













