शिवतीर्थ च्या विकासासाठी 16 कोटी मंजूर खा श्री छ उदयनराजेंची माहिती

सातारा : मराठा साम्राजाची राजधानी असलेत्या सातारा या ऐतिहासिक नगरीमधील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजयांच्या पोवईनाक्यावरील पूर्णाकृती पुतळयाच्या नुतनीकरणासाठी सातारा नगरपरिषदेने राज्य शासनास सादर केलेल्या १६ कोटी १४ लाख रुपयांच्या प्रस्तावास आज राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी तत्वचतः मंजूरी दिली.शिवप्रभुंच्या साता-यातील प्रेरणास्थळासाठी आणि सातारकरांच्याकरीता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सूचनेनुसार या प्रस्ताबावर तातडीने निर्णय घेवून निधी सुध्दा नगरपरिषदेला प्रदान केला जाईल अशी ग्वाही देखिल याप्रसंगी ना. एकनाथ शिंदे यांनी आज दिली आहे अशी माहीती खासदार श्रमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली. राज्याच्या विविध कामांकरीता ना. एकनाथ शिंदे आज दिल्ली येथे आले आहेत. त्या दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ना.शिंदे यांची सदिच्छा भेटघेतल्यावर, दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची आज दिल्लीत भेट घेतली. आनंद वाटला. त्यांना मनापासून शुभेच्छा दित्या,ना.फडणवीस साहेब आपल्याबरोबर आहेत त्यामुळे चांगलंच आहे अश्या शब्दात विविध विषयावर हितग्ज करताना,ना.शिंदे यांना प्रोत्साहनात्मक बळ खासदार उदयनराजेंनी दिले.भेटी दरम्यान विविध विषयावर चर्चा करताना,सातारा पोवईनाका येथील शिवप्रभुंच्या स्मारकाच्या नुतनीकरणाविषयी आजपर्यंत झालेल्या कामांची माहीती यावेळी मुख्यमंत्रयांना दिली. तसेच सातारा नगरपरिषदेने या परिसराच्या विकासाचा सुमारे १६ कोटी १४ लाख रुपयांच्या प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे.त्यास राज्य सरकारकड़न सातारा नगरपरिषदेला निधी वितरीत करण्यात याबा अशी विनंती केली. शिवप्रभुंच्या पूर्णाकृती स्मारकाच्या प्रेरणादायी कार्यासाठी,खासदार श्रीमंत छत्रपती उद्यनराजे भोसले यांनी केलेल्या सूचनेचा आम्ही नितांत आदर करतो, याकामासाठी आजच मी तत्वतः मान्यता देत आहे, नगरपरिषिदेच्या प्रस्तावानुसार, राज्य सरकारकडून जरुर ती कार्यवाही करुन, तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी माझी राहील असे ठठोस आश्वासन ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाच्या परिसराच्या विकासाचा परिपूर्ण प्रस्ताब सातारा नगरपरिषदेने राज्य शासनाकड़े सादर केला आहे. सदरच्या प्रस्तावातील विविध कामे सध्या सुरु करण्यात आलेल्या कामाला अनुषंगीक अशी सूचवण्यात आली आहेत. या प्रस्तावास मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मंजूरी दिली असल्याने, सातारा शहराचे नाक समजण्यात येणा-या आणि आठ रस्ते एकत्र येणा-या पोवई नाका परिसराचा समयोचित सुयोग्य विकास साध्य होणार आहे. सातारकरांना अभिमान वाटेल व प्रेरणा मिळेल अश्या मोठया विकास कामाची सुरुवात देखिल लवकरच होईल असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला