अंमली पदार्थांची झाडं लावणाऱ्यावर मोक्का लावा.अन्यथा, आंदोलन छेडण्यात येईल : जिल्हाध्यक्ष आरपीआय
कुणाल खंदारे - Sat 5th Nov 2022 11:03 am
- बातमी शेयर करा
सातारा : अंमली पदार्थ निर्माण होणारी झाडं लावणाऱ्या जय दुर्गा स्क्रॅपचा मालक ठाकूर यांच्यावर व त्याच्या सहकाऱ्यांवरती मोकांतर्गत कारवाई करावी.अन्यथा, आरपीआयमार्फत आंदोलन छेडण्यात येईल. असे आवाहन जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ व जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे यांनी केले आहे.
यासंदर्भात,पोलिसांनी केलेल्या कारवाईचे प्रथमतः पक्षातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. वाडे फाटा मळवी येथील जय दुर्गा माता स्क्रॅप मर्चंटच्या नावाने वाडे चौकामध्ये एका प्ररप्रांतीय ठाकूर नावाच्या व्यावसायिकाची भंगारचे दुकान आहे. तेच त्या दुकानाच्या आतमध्ये साधारणपणे चार अमली पदार्थाची झाडे लावून राजरोसपणे गांजा विक्री करीत होते.ठाकूर व त्याच्या सहकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.एकंदरच पोलिसांनी केलेल्या कारवाईचे अभिनंदन आहेच.परंतु, परप्रांतीय भंगारवाला व्यवसायिक यांनी राजरोसपणे अमली पदार्थाची झाडे गांजाची लावल्याने या व्यवसायात अनेक कोणत्या भंगार व्यवसायिकांचे पाठबळ होते हेही शोधणे आवश्यक आहे.कारण,मर्चंटचे मालक ठाकूर यांचे सातारा जिल्ह्यातील अनेक बड्या भंगार व्यवसायिकांची लागेबांधे आहेत. त्यामुळेच त्याच्या प्रकरणांमध्ये तडजोड करण्याकरता अनेक भंगार व्यावसायिक तसेच राजकारणी मंडळी घुसली होती. परंतु पोलिसांनी कुठल्याही प्रकारचे कोणाचेही ऐकून न घेता दबावाला बळी पडले नाहीत. अशा या परप्रांतीय भंगारवाल्यांची दादागिरी व अवैध्यव्यवसायामुळे जिल्ह्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पूर्वी,अशाच बॉम्बे रेस्टॉरंट त्रिशंकू भागातील एका भंगार व्यवसाय करणाऱ्या यादव नावाच्या भंगार व्यावसायिकाने गोळ्या झाडून मर्डर केला होता.अशीच या लोकांची दादागिरी वाढत आहे.त्यास सहकार्य करणारे ही लोक भंगार व्यावसायिकच असून या अवैध व्यवसायातून जमवलेल्या माया भरपूर असल्यामुळे ते पोलिसांनाही व तसेच राजकारणी माणसालाही विकत घेण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे अशा व्यवसायिकांवरती अमली पदार्थ कायद्यानुसार कडक कारवाई करून त्यांना मोका अंतर्गत किंवा रासुका अंतर्गत कायद्या नुसार कारवाई करण्यात यावी.अन्यथा, लवकरच लक्षणीय आंदोलन करण्यात येईल.असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

पोलीसांना अभिनंदनसह कारवाईबाबत निवेदन सादर करताना पूजा बनसोडे शेजारी कार्यकर्ते.(छाया-अनिल वीर)
#rpi
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Sat 5th Nov 2022 11:03 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sat 5th Nov 2022 11:03 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sat 5th Nov 2022 11:03 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sat 5th Nov 2022 11:03 am
संबंधित बातम्या
-
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Sat 5th Nov 2022 11:03 am
-
पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीची ताकद वाढली; शरद लाड, भैय्या माने डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारात सक्रिय
- Sat 5th Nov 2022 11:03 am
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Sat 5th Nov 2022 11:03 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 5th Nov 2022 11:03 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Sat 5th Nov 2022 11:03 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Sat 5th Nov 2022 11:03 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Sat 5th Nov 2022 11:03 am












