टोलनाके चालवणारी व्यक्ती राजघराण्यात जन्माला आली कशी?....आ.शिवेंद्रराजे भोसले

सातारा : टोलनाके चालवणारी व्यक्ती राजघराण्यात जन्माला आली कशी? मिशी आणि भुवया काढणे हे उदयनराजेंचे नेहमीचेच तुणतुणे - आ.शिवेंद्रराजे भोसले यांची उदयनराजेंवर टीका..

 साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात पालिकेच्या भ्रष्टाचारावरून आणि राज घराण्यावरून एकमेकांवर टीका सुरू आहे.. टोलनाके चालवणारी व्यक्ती राजघराण्यात जन्माला आली कशी? असा सवाल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे यांना उपस्थित केला आहे.. मिशी आणि भुवया काढणे हे उदयनराजेंचे नेहमीचेच तुणतुणे असून त्यांचे वडील असल्यापासून 30 ते 35 वर्षांपासून ते सुरू असून आता त्यांनी ते बंद करावा.. टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये..त्यांचे राजकीय त्यांना लाख लाभ.. येणाऱ्या पालिका निवडणुकीत उदयनराजेंना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा खोचक टोला शिवेंद्रराजे यांनी लागवलाय.. साताऱ्यात चुकीचे काम सुरू आहे त्याच्या विरोधात मी आहे.. आमच्या वादात भाजप पक्षाच्या नुकसानीचा विषय येत नाही.. पेंटिंग काढून साताऱ्याचा विकास होणार असेल तर गल्लीबोळात पेंटिंग काढा मात्र त्या पेंटरला पैसे द्या असा खोचक टोला देखील राजेंना लागवलाय..

आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले म्हणाले, अजिंक्यातारा सहकारी कारखाना उत्तम चालला आहे. अजिंक्यतारा कारखाना एका हंगामात २१३ कोटी रुपये शेतकऱ्यांना देतो. या कारखान्याची उलाढाल ३६० काेटींची आहे.शेतकऱ्यांची बिले पंधरा दिवसाच्या आत जमा केली जातात .सूतगिरणी मध्ये दोनशे कामगार कामाला असून तीन कोटी रुपये पगाराला आणि बोनसला वीस लाख रुपये दिले जातात त्या माध्यमातून सातारा तालुक्याच्या अर्थकारणामध्ये अजिंक्य उद्योग समूहाचे मोठा हातभार आहे असे असताना आपण काहीच केलेले नाही त्यामुळे आपण अजिंक्य उद्योग समूहाच्या भ्रष्टाचाराचे जे तुंणतुणे वाजवत आहात ते आपण बंद करावे.

दरम्यान तुमच्या आघाडीने पालिकेत केलेला भ्रष्टाचार आम्ही जनतेसमाेर मांडत राहणार. सामान्य कुटुंबातील महिलेला नगराध्यक्षाचा कारभार करुन दिला नाही. गेल्या पाच वर्षात पालिका धुण्यापलीकडे तुम्ही काही केले नाही हे सातारकरांना देखील कळून चुकले आहे.पाच वर्षाचा भ्रष्टाचार कारभाराचा नाकर्तेपणा लपवण्यासाठीच तुम्ही भावनिक राजकारण करत आहात  सातारा पालिका भ्रष्ट मुक्त करण्यासाठी आम्ही आता तयारीला लागलेलो आहोत. सातारकर लवकरच उदयनराजे आणि त्यांच्या आघाडीला नारळ देणार यात शंका नाही. माझ्या सारखी छत्रपतींच्या घराण्यात कशी जन्मली असे उदयनराजेंनी म्हटलं हाेते. मी तर म्हणतो टोलनाका चालवणाऱ्यांचा जन्म घराण्यात कसा झाला. छत्रपतींचा वारसा सांगणा-यांनी लाेकांना त्रास द्यायचा, दादागिरी करायचे असे वागावे का. त्यामुळे टाेल नाका चालविणा-या खासदारांनी मला शहाणपणा शिकवू नये असा इशारा देखील शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना दिला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला