फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
राजेंद्र बोंद्रे- Wed 29th Apr 2026 06:21 pm
- बातमी शेयर करा
फलटण.: फलटण शहर आणि तालुक्यातील शासकीय जागेत बांधकाम केलेल्या नागरिकांसाठी अत्यंत योग आणि महत्त्वाचा निर्णय माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी पंचायत समिती फलटण येथे झालेल्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार सचिन पाटील यांनी नागरिकांसाठी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे.
रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याने आणि सकारात्मक विचाराने शासनाच्या धोरणानुसार 500 ते 1500 स्क्वेअर फुट फक्त निवासी अतिक्रमणे आता नियमित करण्यात येणार आहेत.
या महत्वपूर्ण महत्वपूर्ण निर्णय याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासकीय बैठक आयोजित केली होती. यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की अतिशय प्रभावीपणे आणि निपक्षपणे आपणाला या निवासी अतिक्रमणाबाबत अंमलबजावणी करण्याची असून प्रशासनाने काटेकोरपणे नियमांचे पालन करून ही योजना प्रभावीपणे राबवावी.
आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा क्षेत्र स्तरीय आढावा समिती गठीत करणार सर्वांनी त्यांच्या सूचनांचे पालन करून या नियमन करण्याच्या प्रक्रियेत विधानसभा सदस्य आमदार यांची शिफारस आवश्यक आहे. भूमी अभिलेख विभागाने खाजगी मोजणी दार घेऊन तातडीने दिरंगाई न करता मोजणीचे कामकाज सुरुवात करावी अशी सूचनाही भूमि अभिलेख अधिकाऱ्यांना देण्यात आली. फलटण तालुक्यातील एकही घर या योजनेपासून वंचित राहता कामा नये असाही प्रशासनाला त्यांनी सूचनावजा इशारा दिला आहे.
आमदार सचिन पाटील यांनी यावेळी सांगितले की सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि काटेकोरपणे ही योजना प्रभावीपणे राबवण्याचे असून याची सर्व जबाबदारी माझी असल्यामुळे सर्वांना नियमानुसार अतिक्रमणे नियमित करण्यासाठी मदत करावी आणि कोणतेही चुकीचे काम करू नये अशी सूचनाही त्यांनी प्रशासकीय अधिकारी व इतरांना दिली आहे.
फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष नाईक निंबाळकर या बैठकीला सर्व प्रमुख नगरसेवकासहित उपस्थित होते यावेळी त्यांनी फलटण शहरातील खुल्या जागांची (ओपन स्पेस) तातडीने भूमी अभिलेख च्या वतीने मोजणी करून नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन नागरिकांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या सोयी सुविधांसाठी विकसित करण्याची असल्यामुळे काटेकोरपणे याची अंमलबजावणी करावी अशा सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणाबाबत शासनास माहिती देण्यात यावी असेही नगराध्यक्ष समशेर सिंह आणि आमदार सचिन पाटील यांनी आवाहन केले आहे.
फलटण शहरात काही अतिक्रमणधारक हे अतिक्रमण केलेले घर दुसऱ्याच देऊन स्वतः दुसऱ्या आधुनिक फ्लॅट किंवा घरामध्ये राहत असल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत काटेकोर अंमलबजावणी करून फलटण शहरात नगरसेवक व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी जाणून काटेकोरपणे कामकाज करणे गरजेचे आहे.
रणजीत सिंह निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेर सिंह यांनी ओपन स्पेस बाबत केलेल्या सूचने च्या अनुषंगाने प्रांताधिकारी सौ प्रियांका आंबेकर यांनी सांगितले की नगरपालिकेच्या नावावर फलटण शहरातील सर्व खुल्या जागा नगरपालिकेच्या नावावर विहित नमुन्यात करण्यात येतील यासाठी नगरपरिषद भूमी अभिलेख आणि महसूल यांच्या संयुक्त विद्यमाने याबाबत कामकाज करण्यात येईल.
या बैठकीत माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी पंचायत समिती येथील शासकीय कामकाजाबाबत पंचायत समितीच्या नूतन सभापती चा काही बाबतीत अवमान होत असल्याचे निदर्शनास येत असून अशा प्रकारे पुन्हा अशा गोष्टी निदर्शनास आल्या तर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. सभापतींच्या निवासस्थानाचे अधिकृत असणाऱ्या निवासस्थानातल्या अपूर्ण कामकाज पंधरा दिवसात पूर्ण करून तसेच इतर काही विषय प्रलंबित आहेत ती कामे तातडीने मार्गी लावावी अशा सूचनाही देण्यात आल्या.
तहसीलदार डॉ अभिजित जाधव यांनी या नियमित अतिक्रमणाबाबत सर्वांनी काटेकोरपणे लक्ष घालून महसूल विभागाकडून आवश्यक असणाऱ्या यंत्रणा आणि मदत इतर सर्व विभागांना तातडीने देण्यात येईल अशी बाही दिली.
या बैठकीस रणजितसिंह , आमदार सचिन पाटील नगराध्यक्ष समशेर सिंह, नगरपरिषदेच्या सर्व समितीचे सभापती नगरसेवक पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले विक्रम आप्पा भोसले सौ जिजामाला नाईक निंबाळकर शिवरूप राजे खर्डेकरअमर भैया निंबाळकर, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद चे सदस्य पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच सर्व इतर अधिकारी ग्रामसेवक तलाठी मंडल अधिकारी व फलटण शहर आणि तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
#phaltan
स्थानिक बातम्या
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 29th Apr 2026 06:21 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 29th Apr 2026 06:21 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 29th Apr 2026 06:21 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 29th Apr 2026 06:21 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 29th Apr 2026 06:21 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Wed 29th Apr 2026 06:21 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Wed 29th Apr 2026 06:21 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Wed 29th Apr 2026 06:21 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Wed 29th Apr 2026 06:21 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Wed 29th Apr 2026 06:21 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 29th Apr 2026 06:21 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 29th Apr 2026 06:21 pm












