ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने युवतीचा विनयभंग

सातारा : ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधितावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. १४ फेब्रुवारी घडली आहे. तक्रारदार युवतीच्या कुटुंबियांच्या ओळखीने ज्योतीष संतोष चव्‍हाण हा दुपारी ४ वाजता घरी गेला. घरामध्ये तक्रारदार युवती, तिचा भाउ व आई होते. ज्योतिषाने युवतीचा पत्रिका पाहून 'मुलीला पोटाचा मोठा आजार होणार आहे. भविष्यात लग्न होणार नाही,' असे सांगून भावनिक केले. यानंतर ज्योतिषाने जन्‍मपत्रिका पाहून नाडी चेक करायचे असल्‍याचे सांगून युवतीला बेडरुममध्ये थांबण्यास सांगितले. हीच संधी साधत चव्‍हाण याने युवतीचा विनयभंग केला. ज्योतिषाने विनयभंग केल्‍यानंतर युवती घाबरली. तिने मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्‍न करताच याबाबत कोणाला काहीही न सांगण्याची धमकी दिली. तसेच 'तुझ्यावरील सर्व संकटे मी दूर करु शकतो,' असे सांगून भावनिक केले. या सर्व घटनेने युवती घाबरली. ज्योतिषाने घरातून जाताना युवतीचा मोबाईल नंबर घेतला.

त्‍यानंतर दि. १६ फेब्रुवारी रोजी ज्याेतिषाने युवतीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करण्यास सुरुवात केली. यामुळे युवती आणखी घाबरली व तिने १४ रोजी घडलेल्‍या घटनेविषयी व १६ रोजी आलेल्‍या ज्योतिषाच्या मेसेजची माहिती कुटुंबियांना दिली. त्‍यानुसार कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यात जावून ज्योतिषाविरुध्द तक्रार दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला