गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
राजेंद्र बोन्द्रे
- Sat 27th Jun 2026 06:44 pm
- बातमी शेयर करा
फलटण. फलटण तालुक्यातील पूर्व भागातील गुणवरे गावचा अंकुश रामचंद्र कोळेकर यांनी आपल्या घराशेजारी जागेत गांजाचे झाडे लावून गांजाची शेती करण्याचा प्रयत्न केला.
याबाबतची माहिती मिळाल्यावर नुकताच पदभार स्वीकारलेले फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्य कुमार गोडसे यांनी वरिष्ठांच्या आदेशाने तातडीने हालचाल करून फलटण ग्रामीणचे श्री राजकुमार भुजबळ पोलीस निरीक्षक यांना याबाबत माहिती मिळाल्यावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे नेहमीच धडाकेबाज कामगिरी करणारे स .पो .नि. प्रशांत सुबनावळ आणि महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे पोलीस उपनिरीक्षक संतोष मठपती यांनी त्यांचे कर्तव्यदक्ष कर्मचारी शांतीलाल ओंबासे, योगेश रणपिसे, सागर अभंग, तुषार नलावडे, अमोल देशमुख, अविनाश शिंदे यांचे पथक तयार करून गुणवरे गावातील घु ले वस्ती येथे धाड टाकून तब्बल सात किलो पेक्षाही जास्त गांजा अंदाजे 34 हजार रुपये किमतीचा ताब्यात घेतला आहे. ग्रामीण पोलिसांनी सातारा जिल्ह्याचे एस. पी. श्री निखिल पिंगळे यांच्या आदेशाने आता अवैध धंद्यावरती कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
फलटणचे उपविभागीय अधिकारी श्री धन्यकुमार गोडसे यांनी पदभार स्वीकारताच फलटण तालुक्यात अवैध धंद्यावर कारवाई करण्या चा श्री गणेशा केला आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह अंकुश कोळेकर याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारच्या गांजाची लागवड करणारे अजूनही गांजा सम्राट फलटण तालुक्यात असण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत ही पोलिसांनी सतर्क राहून अशा प्रकारच्या कारवाया करणे गरजेचे दिसून येत आहे.
स्थानिक बातम्या
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sat 27th Jun 2026 06:44 pm
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sat 27th Jun 2026 06:44 pm
शिंदे साहेब, जावळी-महाबळेश्वरची हाक ऐका!
- Sat 27th Jun 2026 06:44 pm
“सात संचालक ‘ताब्यात’… तरी ठराव धुळीस! हुमगावात मानकुमरेंचा हल्लाबोल
- Sat 27th Jun 2026 06:44 pm
संबंधित बातम्या
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sat 27th Jun 2026 06:44 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sat 27th Jun 2026 06:44 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sat 27th Jun 2026 06:44 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sat 27th Jun 2026 06:44 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 27th Jun 2026 06:44 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 27th Jun 2026 06:44 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 27th Jun 2026 06:44 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sat 27th Jun 2026 06:44 pm













