पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
निसार शिकलगार - Sat 27th Jun 2026 06:32 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव : अवैध धंद्यांविरुद्ध पुसेगाव पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, खटाव गावाजवळील सिरस वस्ती लगत असलेल्या मळवी शिवारात पोलिसांनी हातभट्टीवर मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी तब्बल १ लाख १ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला आहे. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मळवी शिवारात अवैध हातभट्टी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी मळवी शिवारातून खालील तपास मुद्देमाल जप्त केला.गुळमिश्रित रसायन ९ प्लास्टिक बॅरल्समध्ये भरलेले एकूण २२५ लिटर गुळमिश्रित रसायन (किंमत रु. १,००,०००/-)
हातभट्टी दारू ५ लिटर क्षमतेचे २ कॅन, ज्यामध्ये एकूण १० लिटर हातभट्टी दारू होती (किंमत रु. १,०००/-)
पोलिसांनी एकूण १ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, त्यातील रसायन जागीच नष्ट केले आहे. याप्रकरणी आरोपी *शरद संजय जाधव* (वय ३०, रा. खटाव, ता. खटाव) याच्याविरुद्ध पुसेगाव पोलीस ठाण्यात गु.रं.नं. १५२/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (इ)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची धडक कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती तेरणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) नागनाथ खुणे पोलीस हवालदार विपुल भोसले, तात्यासाहेब ढोले, पोलीस कॉन्स्टेबल शंकर सुतार, दर्याबा नरळे, अविनाश घाडगे आणि होमगार्ड बकरे यांच्या पथकाने केली.
सपोनि नागनाथ खुणे यांचे आवाहन या धडक कारवाईनंतर पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, "आपल्या गावात किंवा परिसरात कुठेही अशा प्रकारे अवैध हातभट्टी किंवा इतर बेकायदेशीर धंदे सुरू असतील, तर नागरिकांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ व गोपनीय रित्या माहिती देऊन सहकार्य करावे. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव संपूर्णपणे *गोपनीय* ठेवण्यात येईल."
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 27th Jun 2026 06:32 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 27th Jun 2026 06:32 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 27th Jun 2026 06:32 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 27th Jun 2026 06:32 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 27th Jun 2026 06:32 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 27th Jun 2026 06:32 pm
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 27th Jun 2026 06:32 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sat 27th Jun 2026 06:32 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sat 27th Jun 2026 06:32 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sat 27th Jun 2026 06:32 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sat 27th Jun 2026 06:32 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 27th Jun 2026 06:32 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 27th Jun 2026 06:32 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 27th Jun 2026 06:32 pm












