१०८ रुग्णवाहिकेच्या निविदेची वर्क ऑर्डर निघाली
Satara News Team
- Tue 13th Aug 2024 06:31 pm
- बातमी शेयर करा
सातारा : राज्यात १०८ रुग्णवाहिकांच्या संख्यते वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता, राज्य शासनाच्या वतीने सदर निविदेची वर्क ऑर्डर नुकतीच काढली आहे. परंतू मंत्रिमंडळ मंजुरीचा निर्णय मात्र प्रलंबित ठेवला आहे. नवीन निविदेनुसार बोट, बाईक व ५ जी तंत्रज्ञानयुक्त रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. विशेषबाब म्हणजे नवजात शिशूंसाठी वेगळी रुग्णवाहिका नव्या निविदेत असणार आहे. निविदेसंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. तरी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीव्हीजी व सुमित फॅसिलिटी यांची निविदा थांबवली असल्याचा खोडसाळ प्रचार करण्यात आला.
निविदेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यात सुसज्ज अत्याधुनिक आपत्कालीन कक्ष उभारण्यास चालना मिळणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर, इंजिनियर व पॅरामेडिकल स्टाफ असे एकूण १२,००० रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. अगामी काळात बीव्हीजी व सुमित फॅसिलीटी लिमिटेड यांच्या वतीने राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा देण्यात येणार आहे.
नवीन निविदेनुसार १७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहे. यात ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट (ए.एल.एस) व बेसिक लाईफ सपोर्ट (बी.एल.एस) या रुग्णवाहिकांचा समावेश आहे. आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेत बोट रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. समुद्रतट,व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना बोट रुग्णवाहिकांचा लाभ घेता येणार आहे. अलिबाग परिसरातील रुग्णांना महामार्गाने मुंबईला जाण्यासाठी ५ ते ६ तासाचा अवधी लागतो. बोट रुग्णवाहिकेमुळे अलिबागकरांना अवघ्या ३० मिनिटात मुंबईतील अद्यावत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे. मुंबई शहरातील धारावी, विदर्भातील मेळघाट, चिखलदरा या भागात रुग्णवाहिका पोहचत नाही. या ठिकाणी बाईक रुग्णवाहिकेद्वारे आपत्कालीन सेवा देण्यात येणार आहे.
आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेत नव्या निविदेनुसार ५ जी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी कॅमेराद्वारे रुग्णाशी सातत्याने संपर्कात राहण्यास मदत होणार आहे. राज्यातील नागरीक अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेण्यासाठी मंत्रीमंडळच्या निर्णयाची वाट पहात आहे.
गेल्या १० वर्षात १ कोटी पेक्षा अधिक नागरिकांनी १०८ रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे. विशेषबाब म्हणजे या सेवेमुळे १५ लाखा पेक्षा अधिक रुग्णांचा जीव वाचला आहे. ग्रामिण व शहरी भागात ४० हजार प्रसूती रुग्णवाहिकेत झाल्या आहेत. करोना सारख्या भयावह आजाराच्या कालखंडात ९६ टक्के रुग्णवाहिका सुरु होत्या. या दरम्यान ६.५० लाख रुग्णांना सदर सेवेचा लाभ झाला होता.
सद्यस्थितीत रुग्णवाहिकांची संख्या :
ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : २३३
बेसिक लाईफ सपोर्ट : ७०४
बाईक ॲंब्युलंन्स : ३३नव्याने वाढणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या :
ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : २५५
बेसिक लाईफ सपोर्ट : १२७४
बाईक ॲंब्युलंन्स : १९६
नवजात शिशुंसाठी रुग्णवाहिका : २५
बोट ॲंब्युलन्स : ३६
स्थानिक बातम्या
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Tue 13th Aug 2024 06:31 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Tue 13th Aug 2024 06:31 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Tue 13th Aug 2024 06:31 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Tue 13th Aug 2024 06:31 pm
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Tue 13th Aug 2024 06:31 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Tue 13th Aug 2024 06:31 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Tue 13th Aug 2024 06:31 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Tue 13th Aug 2024 06:31 pm
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Tue 13th Aug 2024 06:31 pm
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Tue 13th Aug 2024 06:31 pm
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Tue 13th Aug 2024 06:31 pm
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Tue 13th Aug 2024 06:31 pm
-
सर्वसामान्य जनतेच्या मते औंध पोलिस ठाण्याचे विद्यमान कारभारी अवैध व्यवसायांच्या बाबतीत गांधारीच्या भुमिकेत
- Tue 13th Aug 2024 06:31 pm












