आषाढीनिमित्त वडगांव हवेली येथील शाळेत प्रतीकात्मक दिंडी सोहळा
Satara News Team
- Mon 26th Jun 2023 12:41 pm
- बातमी शेयर करा
तांबवे : आषाढी एकादशीचे औचित्य साधून वडगाव हवेली ता कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर यांच्यावतीने विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या दिंडीमधील पालखी , ज्ञानेश्वरी,संत तुकाराम महाराज ग्रंथाचे पुजन संस्था संचालक जे.के.जगताप,माजी तंटामुक्ती अध्यक्ष जे.जे.जगताप, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत काटवटे यांनी केले.दिडी मध्ये वेशभूषेतील विठ्ठल,रुक्मिणी,संत तुकाराम महाराज यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले तसेच वारकरी वेषातील लहान मुले, मध्यभागी पालखी,भगव्या पताका,टाळ मृदंग वाजवत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या जय घोषात , विठूनामाचा गजर अशा वातावरणामध्ये दिंडी सोहळा रंगला. या दिंडी सोहळ्यात विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले.
तया बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे शाळेच्या वतीने नियोजन मुख्याध्यापक प्राथमिक डी.पी.पवार मुख्याध्यापिका व्ही.एच.कदम यांनी केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्ताने प्रतीकात्मक दिंडी काढली होती.
या दिंडीचे ग्रामस्थांनी ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले. या दिंडी सोहळ्यामुळे टाळ, मृदुंग व विठू नामाने
परिसर भक्तीमय तसेच विठ्ठमय झाला. हाती भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या लहान मुली यामुळे पालखी मार्ग अधिकच खुलून गेला होता.
या दिंडीचे स्वागत ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सरपंच राजेंद्र जगताप, यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रापंचायत प्रांगणात रिंगण सोहळा, झिम्मा फुगडी हे खेळ मुली खेळल्या.
या दिंडी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी एन.एस.पोळ,ए.एल.
पाटील,एस. एम. आवटी,एन.एस.कराळे,एल.जे.कुंभार,ए.एल.लोकरेएम.एस.सकटे,एम.एस.पाटील, एम.डी.पाटील,अश्विनी सांळुखे आदीं शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी दादा पाटील, अब्दुल मुल्ला, शिवाजी चव्हाण व
व्यवस्थापन कमिटीच्या सदस्यांचे योगदान लाभले.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Mon 26th Jun 2023 12:41 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Mon 26th Jun 2023 12:41 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Mon 26th Jun 2023 12:41 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Mon 26th Jun 2023 12:41 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Mon 26th Jun 2023 12:41 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 26th Jun 2023 12:41 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 26th Jun 2023 12:41 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 26th Jun 2023 12:41 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 26th Jun 2023 12:41 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 26th Jun 2023 12:41 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 26th Jun 2023 12:41 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 26th Jun 2023 12:41 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 26th Jun 2023 12:41 pm













