सातारा पोलिस ॲक्शन मोडवर; साडेचार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिस ॲक्शन मोडवर असून, पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला आहे. यासाठी ते तब्बल साडेचार हजार व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहेत. निवडणूक काळात अवैध प्रकार टाळण्यासाठी रूट मार्च, कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी अधिक सतर्क राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगून पोलिस अधीक्षक समीर शेख म्हणाले, मागील निवडणुकांमध्ये ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत. त्यांचे रेकॉर्ड तपासले जात असून, निवडणूक होण्यापूर्वी जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

तसेच जिल्ह्यातील ज्या व्यक्तींकडे शस्त्र परवाना आहे, त्यांना निवडणुकांआधी शस्त्र जमा करण्याचे आवाहन केलेले आहे. काही ठिकाणी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर आमचे विशेष लक्ष असेल. अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल. प्रत्येक पोलिंग बूथला पोलिसांचे संख्याबळ दिले जाणार आहे.

राज्य राखीव बल, सीआरपीएफ, होमगार्डचे संख्याबळ आम्ही बंदोबस्तासाठी उपयोगात आणणार आहे. मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी पैशांचे वाटप, अमली पदार्थांचे वाटप होत असेल तर त्यावर आम्ही लक्ष ठेऊन कारवाई करणार आहोत.निवडणुका काळात अवैध प्रकार टाळण्यासाठी रूट मार्च, कोंम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी राज्य राखीव पोलिस दल व केंद्रस्तरावरील सीएफएफची मदत घेणार असल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला