जुगार अड्ड्यावर छापा : 8 जण ताब्यात तर 1 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त

नागठाणे ; सायळी (पुनः) ता.सातारा येथे चोरून सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी रविवारी सायंकाळी उशिरा कारवाई करत सुमारे १.६९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी ७  संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकजण पळून जाण्याचा यशस्वी झाला.
       याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोपर्डे नजीक असलेल्या सायळी (पुनः) येथे गावच्या कमानीजवळ दत्तात्रय हनुमंत कदम यांच्या पत्र्याच्या शेडच्या आडोश्याला काही लोक पैसे लावून तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती सपोनि  चेतन मचले यांना रविवारी दुपारी मिळाली होती.यावेळी सपोनि चेतन मचले,पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर,हवालदार हणमंत सावंत,दादा स्वामी,उत्तम गायकवाड, संजय जाधव व राहुल भोये यांनी तेथे छापा टाकला.
          यावेळी पोलिसांनी तेथून निवास काशिनाथ इंगूळकर (रा.सायळी,ता.सातारा),राजेश रामचंद्र इंगूळकर (रा.सायळी,ता.सातारा),शत्रुघ्न भगवंत कदम(रा.कोपर्डे,ता.सातारा),तात्यासो महादेव कदम (रा.कोपर्डे,ता.सातारा),सुशील सूर्यकांत कदम (रा.कोपर्डे, ता.सातारा),निवास दादासो यादव(रा.कोपर्डे, ता.सातारा),ज्ञानदेव बाळासो कदम (रा.सायळी, ता.सातारा) या संशयितांना तीन पानी जुगार खेळताना ताब्यात घेतले असून  गणेश बाळकृष्ण यादव (रा.कोपर्डे, ता.सातारा) हा घटनास्थळावरून पळून जाण्याचा यशस्वी झाला.पोलिसांनी यावेळी तीन दुचाकी,सहा मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे १.६९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार फिरोज शेख करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त