देऊर येथे विजेचा शॉक लागून शेतकऱ्यासह गाईचा मृत्यू....

कोरेगाव : देऊर ता.कोरेगाव येथे गायी चारत असताना, विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह ,गाईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिल मारुती कदम (वय ६० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

       याबाबत घटनास्थळ व वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देऊर  येथील शेतकरी अनिल कदम हे आज गुरुवार दि, १ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गाई चारण्यासाठी देऊर येथील सातारा - लोणंद महामार्गा लगत नवीन प्लॉटिंग असलेल्या गट नंबर ६२३ मध्ये गेले होते. या प्लॉटमध्ये नवीन घराचे बांधकाम चालू असून या बांधकाम कामासाठी शेजारी असलेल्या विहिरी वरून जमिनीवर केबल टाकून लाईट कनेक्शन घेतले होते. दरम्यानच्या काळात गाई चारत असताना चरत असलेल्या गाईचा जमिनीवर पडलेल्या इलेक्ट्रिक वायरला स्पर्श झाला व त्यावेळी शॉक लागल्याने जर्सी गाय जागेवरच पडली. गाय का पडली म्हणून बघायला गेलेल्या अनिल कदम यांना सुद्धा विजेचा धक्का लागून तेही जागीच मृत झाले सदर घटनेची फिर्याद योगेश लक्ष्मण चव्हाण वय ३५ रा. पाटखळ यांनी वाठार पोलिसात दिली असून तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त